Friday, July 5, 2024

बाबो! ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नींची कमाई आहे कोटींमध्ये, जाणून घ्या नक्की करतात तरी काय?

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो अस म्हणतात. पण बॉलिवूड अभिनेत्यांच्या पत्नी याबाबतीत अपवाद आहेत अस म्हणाव लागेल. कधीही चर्चेत न येणाऱ्या, सोशल मीडिया जगतापासून चार हात लांब राहणाऱ्या या कलाकार मंडळींच्या पत्नींची कमाई त्यांच्या पतींपेक्षाही जास्त आहे. उद्योग जगतात या महिलांनी घेतलेली भरारी अनेकांना तोंडात बोट घालायला लावेल अशीच आहे. पाहूया बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या पत्नींची कमाई. 

आयेशा श्रॉफ – अभिनेते जॅकी श्रॉफ आणि आयेशा श्रॉफ यांची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. रविवार ( ५ मे)  दोघांचा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे जॅकी श्रॉफने आयशासोबत तिच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न केले होते. 5 जून 1987 रोजी त्यांचे लग्न झाले. जॅकी श्रॉफला सगळेच ओळखतात. पण, त्यांची पत्नी आयशा सोशल मीडियापासून लांब असते.आयेशा श्रॉफ एक चित्रपट निर्माती आहे. जॅकी श्रॉफसोबत ती जॅकी श्रॉफ एंटरटेनमेंट लिमिटेड ही मीडिया कंपनी चालवते.

सुनिता कपूर – अभिनेता अनिल कपूरची पत्नी सुनीता कपूरही एक यशस्वी उद्योजक आहे. ती एक फॅशन स्टायलिस्ट आहे आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सच्या यादीत तिचा समावेश आहे. याशिवाय तिची स्वतःची यशस्वी ज्वेलरी लाइन आहे. त्यांच्या दोन्ही मुली सोनम कपूर आणि रिया कपूर यांनाही त्यांच्या आईकडून व्यवसायाची कला अवगत केली आहे. सुनीता कपूरचे डिझाइन केलेले दागिने राजघराण्यापासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण परिधान करतात. फोर्ब्स आणि बिझनेस इनसाइडरच्या मते, सुनीता कपूरची एकूण संपत्ती सुमारे 150 कोटी आहे.

माना शेट्टी – बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार सुनिल शेट्टीची पत्नीही सोशल मीडियापासून नेहमीच दुर असते. माना शेट्टी भारतातील यशस्वी महिला उद्योजिकांपैकी एक आहे. माना तिच्या फर्निशिंगच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. माना शेट्टी ही एक यशस्वी बिझनेसवुमन तसेच एक यशस्वी सामाजिक कार्यकर्ता आणि रिअल इस्टेट क्वीन आहे. माना शेट्टीने पती सुनील शेट्टीसोबत A2 नावाचा रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत त्यांनी मुंबईत अनेक आलिशान व्हिला बांधले आहेत. 6500 चौरस फुटांवर पसरलेला, प्रत्येक व्हिला सर्व सुखसोयींनी सुसज्ज आहे. याशिवाय माना शेट्टी एक लाइफस्टाइल स्टोअर देखील चालवते ज्यामध्ये सजावटीपासून ते रोजच्या लक्झरीपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. ती ‘सेव्ह द चिल्ड्रन इंडिया’ नावाच्या एनजीओशीही संबंधित आहे. एनजीओचा निधी उभारण्यासाठी माना शेट्टी वेळोवेळी ‘आरिश’ नावाने प्रदर्शनेही भरवतात आणि त्यातून येणारा पैसा महिलांच्या गरजांसाठी वापरला जातो. सुनील शेट्टीने 1991 मध्ये मनासोबत लग्न केले होते. माना शेट्टीची एकूण संपत्ती 14 कोटी रुपये आहे.

प्रिया रुंचल – अभिनेता जॉन अब्राहमची पत्नी प्रिया रुंचलही सोशल मीडियापासून नेहमीच लांंब असते. बॉलिवूडमधील कोणत्याही पार्टीलाही ती हजेरी लावत नाही. प्रिया एक आर्थिक विश्लेषक आणि गुंतवणूक बँकर आहे. ती अमेरिकेत राहत होती. फुटबॉल संघ ‘नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लब’ची जबाबदारी घेते. हे काम दोन मोठ्या प्रॉडक्शन हाऊसला हाताळण्यासारखे आहे. मात्र, प्रिया रुंचाल आता अमेरिका सोडून भारतात राहते. प्रियाची एकूण संपत्ती 05 कोटी रुपये आहे. या दोघांनी 2014 मध्ये लग्न केले होते.

अमल सुफिया – दलकीर सलमान हे दाक्षिणात्य सिनेजगतातील लोकप्रिय अभिनेते आहेत. लोकप्रिय मल्याळम अभिनेते ममुटीचे ते चिरंजीव आहेत. त्यांची पत्नी अमल सुफिया ही मोठी इंटेरिअर डिजायनर आहे. अभिनेता दमकीर सलमान पेक्षा त्याच्या पत्नीची कमाई जास्तच आहे. अमल सुफियाची एकूण संपत्ती १५० कोटीची आहे.

हेही वाचा-

अयान मुखर्जीला एडिट करून पुन्हा रिलीज करावा लागला ‘ब्रह्मास्त्र’चा टीझर, जाणून घ्या कारण

‘माझी काळजी नसावी, मी काळजी घेतेय..’अभिनेत्री प्राजक्ता माळीची ती पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

आयफावारी करणाऱ्या सई ताम्हणकरच्या लूकने फॅन्सला झाली mermaid ची आठवण, पाहा तिच्या या लूकमधील फोटो

 

 

हे देखील वाचा