Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

यावर्षी हॉलिवूड चित्रपटांचा भाग बनले हे कलाकार; मोठ्या मंचावर सोडली अभिनयाची छाप…

चित्रपटसृष्टी आता ग्लोबल होत आहे, हॉलिवूडचे गायक बॉलीवूड चित्रपटांमध्ये गाणी गात आहेत. हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपले कलाकार दिसतात. प्रियांका चोप्रा, इरफान खान (दिवंगत) व्यतिरिक्त अनेक बॉलिवूड कलाकार हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडण्यात यशस्वी झाले आहेत. या वर्षीही अनेक बॉलिवूड कलाकार हॉलिवूड प्रोजेक्ट्समध्ये दिसले, त्यांच्या कामालाही खूप पसंती मिळाली.

शोभिता धुलिपाला

शोभिता धुलिपाला सध्या दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. या बॉलिवूड अभिनेत्रीने हॉलिवूडमध्येही आपले अभिनय कौशल्य प्रस्थापित केले आहे. शोभिता यावर्षी देव पटेलच्या ‘मंकी मॅन’ या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती. शोभिताने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिने 9 वर्षांपूर्वी या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते. शोभिताने चित्रपटात तिची व्यक्तिरेखा चोख बजावली आहे.

तब्बू

तब्बू यापूर्वी हॉलिवूड आणि इंग्रजी चित्रपटांचा भाग राहिली आहे. अलीकडेच ती हॉलिवूड मालिका ‘डून: प्रोफेसी’मध्ये सिस्टर फ्रान्सिस्काची भूमिका साकारत आहे. या मालिकेत तब्बूची एन्ट्री झाल्यापासून ती सोशल मीडिया आणि हॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. तब्बूचे हे पात्र खूप दमदार आहे. तब्बूचा अभिनय अप्रतिम आहे आणि या मालिकेतील तिचा लूकही खूपच प्रभावी आहे.

आदर्श गौरव

आदर्श गौरवने प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव यांच्यासोबत ‘द व्हाईट टायगर’ हा चित्रपट केला होता, हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बनवण्यात आला होता. ‘आर्दश गौरव’ लवकरच हॉलिवूड प्रोजेक्टचा भाग बनणार आहे. तो रिडले स्कॉटच्या एलियन प्रीक्वल मालिकेत दिसणार आहे. या हॉलिवूड प्रोजेक्टबद्दल अभिनेता आदर्श गौरव खूप उत्सुक आहे.

ईशान खट्टर

शाहिद कपूरचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरनेही हॉलिवूड मालिका ‘द परफेक्ट कपल’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. यामध्ये ईशानला निकोल किडमन सारख्या प्रसिद्ध आणि उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली. ही मालिका एक मर्डर मिस्ट्री होती. ईशाननेही या मालिकेत आपल्या अभिनयाद्वारे हॉलिवूडच्या प्रेक्षकांना प्रभावित करण्यात यश मिळवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

बॉर्डर २ चे शूटिंग सुरु; हॉलिवूडचा प्रसिद्ध ॲक्शन कोरिओग्राफर डिझाईन करणार साहस दृश्ये

 

हे देखील वाचा