Monday, July 8, 2024

आलिया लग्नाआधी प्रेग्नंट होती का? यावेळी स्वत: अभिनेत्रीनेच केला धक्कादायक खुलासा

आलिया भट्टसाठी 2022 हे वर्ष खूप छान होते. तिने एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केले, त्यानंतर 2 महिन्यातच चाहत्यांना प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली आणि नोव्हेंबरमध्ये एका मुलीची आई झाली. अभिनेत्रीच्या आयुष्यातील गेले वर्ष इतके व्यस्त होते की, ती चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकली नाही. आता थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर तिने मुलाखतीच्या माध्यमातून चाहत्यांच्या काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवसांपासून चाहत्यांच्या मनात हा प्रश्न हाेता की, आलिया लग्नाआधी प्रेग्नंट होती का? यावर जाणूनबुजून असो वा नकळत, या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्रीने चाहत्यांना दिले आहे.

जेव्हा आलिया (alia bhatt) हिने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्याना सांगितले, तेव्हा लोकांना असे वाटले की, प्रेग्नेंसीमुळे तिला लग्न करायला लावले गेले की काय? यावर आलिया माेकळे पणाने बाेली नसली तरी तिने बरेच काही सांगितले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत आलियाने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगितले. आलियाला प्रेग्नेंसीच्या वेळी तिच्या कामाबद्दलच्या नियाेजनाबाबत विचारण्यात आले तेव्हा तिने असे उत्तर दिले की, ‘लग्नापूर्वीच ती प्रेग्नंट असल्याचे लोकांना समजले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

आलियाने सांगितले की, ‘तिने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तिचा पहिला हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’ साइन केला होता. तिला तिच्या चित्रपटाचे वेळापत्रक अशा प्रकारे निश्चित करायचे होते की, तिला प्रेग्नंसीमुळे प्राेजेक्टमधून मागे हटावे लागणार नाही. टीमने तिची पूर्ण काळजी घेण्याचे आश्वासन दिले. चित्रपटाच्या सेटवरही तिची पुर्ण काळजी घेतली जात होती.’ आलिया भट्टच्या या बोलण्याने चाहत्यांना खात्री पटली की, ती लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती.(bollywood actres alia bhatt gets pregnant before marriage with ranbir kapoor revealed shocking secrets through interview check out details)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
उर्फी जावेदच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘मी तिला थोबडवून काढेन…’

मृणाल ठाकूरच्या नवीन दाक्षिणात्य चित्रपटाची घोषणा, नव्या भूमिकेतून येणार प्रेक्षकांसमोर

हे देखील वाचा