Friday, July 5, 2024

लग्न आणि प्रेग्नंसीनंतर अभिनेत्रींचं करिअर खरंच होतं का बर्बाद? टाका एक नजर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने सोमवारी (दि. २७ जून) तिच्या चाहत्यांसोबत सर्वांनाच सुखद धक्का दिला. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जाहीर केले की, ती प्रेग्नंट आहे. ही आनंदाची बातमी देताना तिने तिचा आणि रणबीर कपूरचा सोनोग्राफी रूममधील फोटोही शेअर केला. अशात आता आलिया प्रेग्नंट आहे म्हणल्यावर तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजीही कदाचित तिने नक्कीच घेतली असणार.

आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने तिच्या आगामी बॉलिवूड सिनेमांचे शूटही जवळपास संपवले आहे. आलियाच्या टीमने सांगितले की, हॉलिवूड सिनेमाची शूटिंग संपवून भारतात आल्यानंतर ती आपल्या प्रोडक्शनशी निगडीत काम सांभाळणार आहे. मात्र, आलिया प्रेग्नंट झाल्यानंतर आता चाहत्यांना अशी चिंता लागली आहे की, तिच्या कारकीर्दीची गती कशी असेल?

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt) 

आई बनल्यानंतर काय बदलते?
बॉलिवूडमध्ये असा विचित्र ट्रेंड येत आहे की, तरुण अभिनेत्रींना मुलबाळ झाल्यानंतर त्यांची कारकीर्द एकप्रकारे संथ होऊन जाते. अचानक त्या सिनेमातून गायब होऊ लागतात. त्यांच्याकडे येणारे ब्रँड प्रोमोशनही आधीच्या तुलनेत कमी होतात. तसेच, मोठ्या पडद्यावर दिसणारे पुरुष कलाकारही बदलू लागतात.

म्हणजे एकूणच कालपर्यंत ज्या अभिनेत्री पडद्यावरील स्टार होत्या, त्याच अभिनेत्रींची ब्रँड व्हॅल्यू मुलबाळ झाल्यानंतर कमी होऊन जाते. अशात असा प्रश्न उपस्थित होतो की, हे सर्व कशामुळे होते? बॉलिवूडमध्ये आई बनलेल्या अभिनेत्री जुनाट विचारांच्या शिकार आहेत आणि कायदे त्यांना ऑफर देणे बंद करतात का?

याच ट्रेंडचा सामना करतेय का अनुष्का शर्मा?
अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही २०१८मध्ये बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. त्याचवर्षी ती सुपरस्टार शाहरुख खान याच्यासोबत ‘झिरो’ या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसली होती. मात्र, जानेवारी २०२१मध्ये अनुष्काने तिचा पती विराट कोहली याच्यासोबत मुलगी वामिकाला जन्म दिला होता. म्हणजेच २०२०मधील अनुष्काचे सर्वाधिक महिने प्रेग्नंसीमध्ये गेले.

यादरम्यानच तिने तिचे ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ प्रोडक्शनचे दोन प्रोजेक्ट ‘पाताल लोक’ वेबसीरिज आणि ‘बुलबुल’ या सिनेमावर काम केले होते. विशेष म्हणजे, ती या प्रोजेक्टची निर्माती होती. अनुष्का ही कंपनी आपला भाऊ कर्णेश शर्मासोबत चालवत होती. मात्र, मार्च २०२२मध्ये तिने भावाच्या हातात सर्व काम सोपवत यातून बाहेरचा रस्ता धरला. जानेवारी २०२२मध्ये तिने भारतीय माजी क्रिकेटपटू झुलन गोस्वामीची बायोपिक ‘चकदा एक्सप्रेस’ या सिनेमातून पदार्पणाची घोषणा केली. मात्र, हा सिनेमाही ‘क्लीन स्लेट फिल्म्स’चाच आहे.

नव्वदच्या शानदार अभिनेत्रीही झाले असेच काही
करिश्मा कपूर
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिने सन २००३मध्ये लग्न केले होते. त्यानंतर तिने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. त्यानंतर तिला समायरा आणि कियान ही दोन मुले झाल्यानंतर २०१२मध्ये तिने विक्रम भट्ट यांच्या ‘डेंजरस इश्क’ या सिनेमातून पुनरागमन केले. आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना तिने गोविंदा, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती.

ऐश्वर्या राय बच्चन
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिने २०११मध्ये मुलगी आराध्या हिला जन्म दिला होता. त्यानंतर तिने ‘जज्बा’, ‘सरबजीत’, ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि ‘फन्ने खान’ या सिनेमात काम केले. हे सिनेमे तिच्या आधीच्या सिनेमांच्या तुलनेत तितके दमदार नव्हते. असेच काहीसे अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या बाबतीतही आहे.

शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने सन २०१२मध्ये मुलगा वियान याला जन्म दिला आणि त्यानंतर ती पडद्यावर काही दिसलीच नाही. मात्र, त्यानंतर तिने २०२१मध्ये आलेल्या ‘हंगामा २’ आणि २०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निकम्मा’ सिनेमात दिसली. मात्र, तिचे हे सिनेमे पाहिल्यानंतर कोणताही बॉलिवूड सिनेमांचा चाहता म्हणेल की, ‘शिल्पाच्या नेहमीच्या सिनेमांच्या तुलनेत हे सिनेमे जरा फिकेच होते.’

अशात या अभिनेत्रींप्रमाणे आलियाचंही असंच होईल का? अशी चिंता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा