Friday, October 18, 2024
Home बॉलीवूड जरा इकडे पाहा! आलिया भट्टने फिगरसाठी नव्हे तर ‘या’ कारणासाठी केले वजन कमी

जरा इकडे पाहा! आलिया भट्टने फिगरसाठी नव्हे तर ‘या’ कारणासाठी केले वजन कमी

अभिनेत्री आलिया भट्टने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी राहाला जन्म दिला. आलियाने तिच्या पहिल्या प्रेग्नेंसी चा खूप आनंद घेतला. कामाच्या आघाडीवर देखील ती सक्रिय राहिली. ‘ब्रह्मास्त्र‘ चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्येही  तिने सहभाग घेतला. आता राहाच्या जन्मानंतर आलिया पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. गरोदरपणात वाढलेले वजन कमी करून तिने पूर्वीसारखाच फिटनेस साधला आहे. याबद्दल स्वत:ह आलीया अलीकडे बाेलताना दिसली.  काय म्हणाली नेमके अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

आलिया भट्ट (alia bhatt) हिने एका मीडिया संवादादरम्यान सांगितले की, “न्यू मॉमला पहिलेसारख्या फिगरमध्ये वापस येण्यासाठी खूप दबाव येताे.” आपल्या वेट लाॅस करण्याच्या प्रवासाबाबत आलिया म्हणाली, ‘चित्रपट हे विजुअल मीडियम आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला आकर्षक दिसावे लागतात. याच कारणामुळे तिला मुलगी राहाच्या जन्मानंतर तिचे वजन कमी करावे लागले.’ आलियाने असेही नमूद केले की, महिलांना त्यांच्या गर्भधारणेपूर्वीच्या वजनाबाबत दबाव जाणवतो. ती म्हणाली की, “मी याबद्दल बोलू शकते, त्यासाठी सोशल मीडियाचे आभार.”

आलिया म्हणाली, “मला खराेखरच याविषयी बोलायचे आहे. गर्भधारणेनंतर, बऱ्याच स्त्रिया त्यांच्या नवीन अपीयरेंससाठी संघर्ष करतात. त्या पूर्वीसारख्या दिसण्यासाठी खूप दडपण घेतात. प्रत्येकाला वजन कमी करायचे असते, मी रिलेट करू शकते. मला जेवणाची आवड आहे. मला माझे आवडते पदार्थ खायला आवडतात. पण, माझे वजन कमी झाले कारण चित्रपट हे विजुअल मीडियम आहे.” आलियाने सांगितले की, “सोशल मीडियावरील प्रत्येक फाेटाेत आकर्षक दिसण्याच्या धडपडीत अनेक महिला इतक्या चिंतेत असतात की गर्भधारणेपूर्वीच त्या दडपणाखाली येतात. क्षणभर थांबून त्यांनी शरीरावर प्रेम करायला शिकले पाहिजे,” असे आलियाचे सांगणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

आलियाने असेही सांगितले की, ‘ती आता फक्त हेल्दी राहण्यासाठी वर्कआउट करते.’ आलिया म्हणाली, ‘वजन कमी होणे म्हणजे केवळ पुर्वी सारख्या शेपमध्ये येणे नव्हे तर तुमची प्रतिकारशक्ती वाढवणे. मी शेपमध्ये राहण्यासाठी व्यायाम करत नाही, मी निरोगी राहण्यासाठी व्यायाम करते.’ यादरम्यान आलियाने नवीन आईला काही टिप्सही दिल्या. ती म्हणाला, ‘प्रोटीन घ्या, भरपूर भाज्या खा, योगा करा आणि चाला.’

आलिया भट्टच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘स्टूडंट ऑफ द इअर’, ‘ब्रम्हास्त्र’, ‘कलंक’, ‘डिअर जिंदगी’ यासारखे दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actress alia talks about her weight lose journey after daughter raha kapoor birth says i wont torture myself)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नाचू किती’ गाण्यावर थिरकली नेहा पेंडसे, व्हिडिओ व्हायरल

एकेकाळी दिग्दर्शक रोहित शेट्टीने लोकल ट्रेनमध्ये खाल्ला आहे महिलांकडून चप्पलीने मार, स्वतःच केला खुलासा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा