अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे हिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. तिने आयव्हर मॅक्रीशी लग्न केले आहे. शाहरुख खान-गौरी, आर्यन, महिमा चौधरी, जॅकी श्रॉफपासून ते डिझायनर मनीष मल्होत्रापर्यंत अनेक सिलेब्स या लग्नाच्या फंक्शनमध्ये सहभागी झाले होते. अशात आता अलाना आणि आयव्हरच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याला पाहून युजर्स संतापले आहेत. काय आहे यामागचे कारण? चला जाणून घेऊया…
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अनन्या पांडेची चुलत बहीण अलना आणि पती आयव्हर मॅक्री सात फेऱ्या मारताना दिसत आहेत. यावेळी बहुतेक कॅमेरामॅन त्यांच्या आजूबाजूला आहे, तर जवळचे लोक त्यांच्यावर पांढऱ्या फुलांचा वर्षाव करत आहेत. सभोवतालची सर्व सजावट देखील पांढर्या रंगाची आहे. पांढऱ्या रंगाच्या फुलांपासून ते वधू-वरांच्या पोशाखापर्यंत सर्व काही पांढरे आहे.
हा व्हिडिओ पाहून बहुतेकांच्या लक्षात आले की, सात फेरे घेत असताना पंडित दिसत नाहीत. त्यातच, लग्नात पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यामुळेही युजर्स संतापले आहे. एका युजर्न कमेंट करत विचारले की, ‘पंडित कुठे आहे?’, तर आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘त्यांच्या पालकांनाही भारतीय संस्कृती माहीत नाही. म्हणूनच मला वाटतं पांढर्या ड्रेस कोड अलाउड केला होता. कोणी मेल्यावर पांढरा रंग घातला जातो! लग्नाच्या वेळी नाही.’ अशात एका युजरने लिहिले की, ‘नवरा मेल्यावर लाल रंगाची साडी घाल.’
View this post on Instagram
अनन्या पांडेने तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात खूप मजा केली. वडील चंकी पांडे आणि भाऊ अहान पांडेसोबत तिने जबरदस्त डान्स केला, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.(bollywood actress ananya panday sister alanna wear white lehenga in wedding make people angry after see saat phere without pandit)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराच्या लग्नात दिग्गज नेते मंडळींचा समावेश; पण युजर्सकडून राज्यसभा महिला खासदार ट्राेल
कपिलचे सहकलाकार का निघून जातात? काॅमिडियन म्हणाला, ‘मला टक्कर देत…’