अनुष्का शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती कुठेही जात असेल किंवा जे काही करत असेल त्याची माहिती ती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. यापूर्वी ती विराट कोहलीसोबत कधी वृंदावन, तर कधी नीम करोली बाबाचे दर्शन घेताना दिसली. अलीकडेच काही दिवसांपुर्वी अभिनेत्री इंदूरमध्ये बाबा महाकालच्या आरतीमध्ये सहभागी झाली हाेती. अशात आता अनुष्का इंदूरमधील महू येथे पोहोचली, जिथे तिचे बालपण गेले. इथे घालवलेला प्रत्येक क्षण अनुष्काला मोठ्या एक्साइटमेंटने आठवला.
अलीकडेच अनुष्का शर्मा (anushka sharma) हिने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती इंदूरचे रस्ते दाखवताना दिसत आहे, जिथे ती लहाणपणी फिरत असे. व्हिडिओमध्ये अनुष्का इंदूरच्या आर्मी एरियाचा क्वार्टर दाखवत आहे जिथे ती लहानपणी राहायची. या दरम्यान तिने बालपणात जिथे जिथे राहिली, खेळली आणि वाढली ते सर्व दाखवले. यासाेबतच अनुष्काने तिच्या जुन्या घरासमोर उभं राहून फोटोसाठी पोजही दिली.
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करताना अनुष्काने मोठ्या उत्सुकतेने लिहिले, “पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील महूला गेली. इथेच मी पोहायला शिकले. भावाने माझ्या वाढदिवशी व्हिडीओ गेम घ्यायला लावला, जो तो एकटाच खेळायचा. माझ्या वडिलांच्या स्कूटरवरुन मी इथे फिरायचे.माझ्या हृदयात कायम राहील अशी जागा.”अनुष्काच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती मिळत असून कमेंट्सचा वर्षाव हाेत आहे.
अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर ती सध्या तिचा आगामी चित्रपट ‘चकडा एक्सप्रेस’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. याआधी, अभिनेत्री शेवटची 2018 मध्ये शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती.(bollywood actress anushka sharma revisits indore house actress shows where she spent childhood and learnt swimming)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिड-कियाराने साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी; फोटो शेअर करत म्हणाला, ‘पहिली होळी मिसेज…’
अखेर दिड महिन्यानंतर टीव्ही अभिनेता शिजान खानला कोर्टाने दिला जामीन, बहिणी शेअर केला फोटो