Saturday, July 6, 2024

अनुष्का शर्माने शेअर केली योगा पोझ; चाहते म्हणाले, ‘सुपरफ्लेक्झिबल’

अभिनेत्री अनुष्का शर्मा जरी तिच्या फिटनेसने लोकांच्या मनावर राज्य करत असली तरी अलीकडे तिचा एक फोटो पाहून चाहते घायळ झाले आहेत. अनुष्काने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मुलगी वामिकाच्या खोलीत योगा करताना दिसत आहे. हे पाहून तिचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स खूप पॉजिटिव रिस्पांस देत आहेत.

अभिनेत्रीने अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अंकाऊटवर एक पाेस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती याेगा करताना दिसत आहे. ही पाेस्ट शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये दाेन इमाेजी टाकल्या आहे. तर फाेटाेच्या बॅकग्राउंडला वामिकाची खेळणीही दिसत आहे. यासाेबतच अभिनेत्रीने तिच्या योगा इन्स्ट्रक्टरलाही तिच्या इन्स्टा पोस्टमध्ये टॅग केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्काचा वर्कआउट रूटीन पाहून तिचे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. तिच्या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्याने लिहिले, ‘व्वा’ तर दुसर्‍या युजर्सने लिहिले, ‘अप्रतिम, हे सोपे दिसते आहे परंतु ते इतके सोपे नाही.’ एका चाहत्याने अनुष्काचे वर्णन ‘सुपरफ्लेक्झिबल’ असे केले आहे, तर दुसर्‍या चाहत्याने ‘मेहनती आई’ असे लिहिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का शर्माच्या वर्कआउट रूटीनमध्ये योगाचा समावेश आहे. काही काळापूर्वी योगावर आपले मत मांडताना अभिनेत्री म्हणाली होती की, गर्भधारणेपासून आतापर्यंत योग हा तिच्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे.

अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर अभिनेत्री ‘चकदा’ चित्रपटात झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्का शेवटची ‘काला’ या चित्रपटात एका विशेष भूमिकेत दिसली होती ज्यामध्ये तिने ‘बलमा घोडे पे क्यूँ सवार है’ गाणे सादर केले होते.(bollywood actre`s`s anushka sharma shared yoga poses fans said superflexible)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खान सोबतच्या ‘त्या’ सीनमुळे माधुरीने ‘हम साथ साथ है’ चित्रपटाला दिला होता नकार, वाचा कारण

कंगना रणौतने तिच्या ‘इमर्जन्सी’साठी ठेवली सर्व संपत्ती गहाण, सोशल मीडियावर स्वतःच केला खुलासा

हे देखील वाचा