Wednesday, July 3, 2024

अनुष्काने केली विराटला दुखवणारी गाेष्ट, नवऱ्याला साेडून बाॅडिगार्डसाेबत…

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन नुकतेच शूटिंगसाठी जात असताना मुंबईतील ट्रॅफिकमध्ये अडकले. यानंतर अमिताभ यांनी न डगमगता एका अनोळखी व्यक्तीकडून लिफ्ट मागितली आणि वेळेवर पोहोचले. याचा एक फोटो स्वत: अभिनेत्याने त्यांच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केला आहे, जाे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अशातच बिग बींनंतर अभिनेत्री अनुष्का शर्माही मुंबईच्या रस्त्यावर बाईकवरून फिरताना दिसली आहे.

तर झाले असे की, मुंबईतील जुहूकडे जाणारा रस्ता झाडे पडल्यामुळे बंद झाला होता, ज्यामुळे अनुष्का (anushka sharma) हिला कार सोडून बाईकवर जावे लागले. अशात अनुष्का शर्मा तिचा बार्डिगार्ड सोनूसोबत बाईकवर जाताना दिसली. याचा एक व्हिडिओ पॅपराझीने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का शर्मा बेज पँटसोबत चेक शर्ट घातलेली दिसत आहे. यासाेबतच अभिनेत्रीने केस बांधले आहेत आणि डाेळ्यांवर गाॅगल लावला आहे

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘आज सगळेजण बाईकवरून जाणार का? बच्चन साहेबही आज बाईकवरून गेले आहेत…’ याशिवाय काही लोक हेल्मेटसाठी अनुष्काला ट्रोल करतानाही दिसत आहेत. युजर्सचे म्हणणे आहे की,’हे चुकीचे आहे..हेल्मेट कोण घालणार?’

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का शर्मा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अशात अभिनेत्री लवकरच ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटात दिसणार आहे. अनुष्काचा हा चित्रपट क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे.(Bollywood actress anushka sharma went on a bike ride with bodyguard after amitabh bachchan video went viral )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“जरा सेटपर्यंत सोडतो का?” अमिताभ बच्चन यांनी चक्क रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट

अनारकली ड्रेसमध्ये हिना खानचे खुलले साैंदर्य, फाेटाे व्हायरल

हे देखील वाचा