Wednesday, June 26, 2024

नववधू अथिया शेट्टी दिसली सिंपल लूकमध्ये, सिंदूर-मंगळसूत्र न घातल्याने संतापले युजर्स

सध्या बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुल त्यांच्या लग्नामुळे चांगलेच चर्चेत आहेत. हे दाेघे 23 जानेवारी रोजी खंडाळ्याच्या फार्महाऊसवर लग्न बंधनात अडकले . या खाजगी विवाह सोहळ्यात फक्त जवळचे सदस्य उपस्थित होते. लग्नानंतर केएल राहुल आणि अथिया दोघेही प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. दरम्यान, अथियानेही तिचा पहिला पब्लिक अपिअरन्स दिला, पण नवविवाहित वधूचा साधा लूक पाहून लोकांना धक्काच बसला. यासाेबतच सिंदूर आणि मंगळसूत्र न घातल्याने अनेकांनी अभिनेत्रीवर आक्षेप घेतला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अथिया शेट्टी (athiya shetty) सलूनमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी तिच्या हातावर अजूनही मेहेंदी रंगलेली दिसत आहे. डेनिम आणि शर्टमध्ये अथिया खूपच कॅज्युअल आणि सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिला पाहून पॅपराझींने तिचे अभिनंदन करायला सुरुवात केली, पण अभिनेत्रीने फारशी प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे जनता तिला खूप काही ऐकवत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अथिया आणि केएल राहुलने इंस्टाग्रामवर प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो शेअर केले आहेत, जे खूप सुंदर आहेत. या फाेटाेमध्ये दोन्ही जोडपे एकमेकांमध्ये हरवलेले दिसतात आणि त्यांच्या लग्नाचा खूप आनंद घेताना दिसतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

लग्नानंतर सुनील शेट्टीने पुष्टी केली आहे की, केएल राहुल आणि अथिया शेट्टीचे रिसेप्शन आयपीएल संपल्यानंतर होणार आहे. या रिसेप्शनला चित्रपट आणि क्रीडा जगतातील अनेक प्रसिद्ध लाेक उपस्थित राहणार आहेत.( bollywood actress athiya shetty first public appearance after marriage with cricketer kl rahul troll)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नीना गुप्तांच्या मुलीने थेट वडिलांसमोरच केलं पतीला किस, व्हायरल व्हिडिओवर नेटेकऱ्यांनी व्याक्त केला संताप

राखीवर कोसळलाय दु:खाचा डोंगर! काही दिवसांपूर्वीच वडीलांच निधन आणि आता आई…, वाचा राखीच्या कुटुंबियांविषयी

हे देखील वाचा