Wednesday, June 26, 2024

अथिया शेट्टीने शेअर केले लग्नाचे सुंदर फाेटाे; म्हणाली, ‘तु प्रेम करणं…’

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुल अखेर आज म्हणजेच 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकले. बातमीनुसार, दोघांचे लग्न पूर्ण विधीनुसार पार पडले आहे. दरम्यान, आता दोघांच्या लग्नाचे पहिले फोटो साेशल मीडिया चांगलेच व्हायरल हाेत आहे.

अनेक दिवसांपासून चाहते अथिया (athiya shetty) आणि केएल राहुल (kl rahul ) याच्या लग्नाची वाट पाहत हाेते. अशात आज (दि. 23 जानेवारी)ला हे जाेडपे सात जन्मासाठी एक झाले आहे. लग्नानंतर समोर आलेल्या पहिल्या फोटोमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

लग्नाचे फोटो अथिया शेट्टीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये अथिया आणि केएल राहुल एकमेकांमध्ये हरवलेले दिसत आहेत. केएल कॅमेराकडे बघत हसत आहे, तर अथिया तिच्या लाइफ पार्टनरकडे पाहून हसत आहे. दोघे फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत. अथिया शेट्टीने फिकट गुलाबी रंगाचा लेहेंगा आणि कुंदन ज्वेलरी घातलेली आहे, ज्यात ती एखाद्या राजकुमारी सारखी दिसत आहे, तर केएल राहुल शेरवानीमध्ये खूप देखणा दिसत आहे. दोघांचे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

काही वेळापूर्वीच अथिया शेट्टीचे वडील आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी यांनी मीडियासमोर येऊन केएल राहुल आणि अथिया लग्न बंधनात अडकल्याची पुष्टी केली होती.आनंद व्यक्त करताना त्यांनी आता सासरे झाल्याचेही सांगितले होते. त्याच्यासाेबत त्याचा मुलगा अभिनेता अहान शेट्टीही होता, ज्याने केएल राहुल कुटुंबात सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सुनील शेट्टीने असेही सांगितले होते की, नवविवाहित जोडप्याचे लग्नाचे रिसेप्शन आयपीएलनंतर होणार आहे.(bollywood actress athiya shetty kl rahul first wedding pictures suniel shetty daughter cricketer looks beautiful happyॉ together )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…त्या वास्तुला पुन्हा एकदा बिलगले’, म्हणत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने शेअर केल्या शाळेच्या आठवणी

केएल राहुल अन् अथियाच्या संगीतात ‘बेशरम रंग’वर थिरकले स्टार, पाहा भन्नाट व्हिडिओ

हे देखील वाचा