Tuesday, July 9, 2024

धक्कादायक प्रसंग! प्रसिद्ध अभिनेत्रीला चाहत्याने लिहिलेले पत्र; ‘जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या…’

बॉलिवूडमधील स्टार्सची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. काहीजण फोटो काढण्यासाठी जवळ येण्याचा प्रयत्न करतात, तर अनेकांना आपल्या स्टारच्या जीवाची पर्वाही नसते. यामुळे कलाकारांना बऱ्याचदा अडचणींना सामोरे जावे लागते. असाच काहीसा प्रसंग एका अभिनेत्रीसोबत घडला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री बिंदिया गोस्वामीया अभिनेत्रीला तिच्या फॅन्समुळे लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. चला तर बघूया नेमका काय होता तो प्रसंग…
बिंदियाच्या आयुष्यातील अनेक किस्से तुम्हाला ऐकायला मिळतील, पण ती कथा तुम्ही क्वचितच ऐकली असेल, जेव्हा गर्दीत अभिनेत्रीचे कपडे फाटले होते. तुम्हालाही ऐकून आश्चर्य वाटले असेल… पण हे खरे आहे. 1980 च्या आसपासची गोष्ट आहे. त्यावेळी कोलकातामध्ये बिंदिया गोस्वामीच्या ‘टक्कर’ या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. बिंदियाची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेल्या लोकांची मोठी गर्दी जमली होती. खचाखच भरलेल्या गर्दीत त्यांच्या एका चाहत्याने असे कृत्य केले, जे कदाचित अभिनेत्री आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
अभिनेत्रीने 2018 मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्या प्रीमियर दरम्यान, अभिनेत्रीने लेस वेलवेट गाऊन घातला होता आणि ती खूप सुंदर दिसत होती. तेवढ्यात गर्दीतून कोणीतरी बिंदिया गोस्वामी (Bindiya Goswami) यांचा गाऊन मागून ओढला, तो ओढताच फुटला. आता त्या व्यक्तीने मागून गाऊन ओढल्यामुळे, फाटला आणि अभिनेत्रीची संपूर्ण कंबर दिसू लागले. त्या घाबरल्या. त्यानंतर त्यांची बहीण पर्ल तेथे आली आणि बिंदिया गोस्वामी यांना सावरले.
आणखी एक किस्सा आहे, जेव्हा बिंदिया गोस्वामी यांचा एक वेडा चाहता तिच्या लेटर बॉक्समध्ये रोज एक पत्र टाकत असे. एकदा त्याने मर्यादा ओलांडली. त्या चाहत्याने अभिनेत्रीला पत्र लिहिलं होतं की, जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी तुझ्या घराच्या दारात आत्महत्या करेन. या वाक्याने त्या घाबरल्या.

बिंदिया गोस्वामी यांनी ही घटना त्यांचा भाऊ राजीव यांना सांगितली. त्यानंतर त्यांच्या भावाने तपास सुरू केला. अखेरीस त्या व्यक्तीचा शोध लागल. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी असून त्यांच्या शेजारी राहणारी व्यक्ती होती. त्या व्यक्तीला अभिनेत्री खूप आवडायची. (bollywood-actress-bindiya-goswami-film-takkar-promotion-strange-story-of-fan)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘रौंदळ’ला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद! विकेंडला कोट्यवधींची कमाई, लवकरच हिंदीतही होणार रिलीज
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी होळीच्या जुन्या आठवणी शेअर करत सांगितली मनातली गोष्ट; वाचा

हे देखील वाचा