Monday, June 17, 2024

बिंदू येताच आपापल्या पतीला लपवून ठेवायच्या महिला, रोचक होता त्यांचा सिनेसृष्टीतील प्रवास

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री बिंदू सध्या चित्रपट सृष्टीपासून दूर आहेत. त्यांनी यांच्या अभिनायने आणि सौंदर्याने सगळ्या प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. बिंदू या अशा एक अभिनेत्री आहेत ज्यांनी पदाद्यावर सर्वात जास्त नकारात्मक पात्र निभावली आहेत. यामुळे त्यांना अनेकवेळा प्रेक्षकांच्या रागाचा देखील सामना करावा लागला आहे.

बिंदू यांनी त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे सर्वत्र नाव कमावले आहे. एक काळ तर असा होता, जेव्हा महिला बिंदू यांना पाहायच्या तेव्हा त्या त्यांच्या पतीला लपवून ठेवायच्या. ही गोष्ट बिंदू यांनी स्वतः सांगितली होती. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबत त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत होते. त्यांनी नकारात्मक निभावलेल्या पात्रांचा परिणाम यांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील झाला होता. (Bollywood actress bindu talk about her career says women would hide their husbund from me)

यावर अभिनेत्रीने सांगितले की, “एकदा मी आणि राखी सार्वजनिक ठिकाणी होतो आणि आम्ही एकमेकींना मिठी मारत होतो. त्यावेळी मला एक आवाज ऐकू आला की, राखी बिंदूला मिठी का मारत आहे? त्यांना मी वैयक्तिक आयुष्यात देखील खलनायिका वाटत होते. मला चित्रपटगृहात देखील अनेकांनी शिवीगाळ केला आहे. परंतु या गोष्टी मी नेहमीच सकारात्मक घेतल्या आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा माझे पुरुष चाहते मला भेटायला येत असतं तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांना ओढत घेऊन जात असतं. त्यावेळी मला खूप हसायला यायचे. परंतु लोकांना रील आणि रियल लाईफमधला फरक समजला नव्हता. पण आता हा फरक सगळ्यांना समजतो. एक व्यक्ती म्हणून मी खूपच हळव्या हृदयाची आहे. परंतु माझ्या त्या अभिनयामुळे जर लोकांना दुःख झाले असेल, तर मी सगळ्यांची माफी मागते.”

यासोबत बिंदू यांनी त्यांच्या फॅन फॉलोविंगबाबत देखील अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, “माझे खूप चाहते आहेत. एक चाहता तर मला रक्ताने पत्र लिहित होता. अशी पत्र उघडताच मला भीती वाटत होती. मजेशीर गोष्ट म्हणजे, त्याने त्याच्या या पत्रात त्याचा रक्तगट कोणता आहे हे देखील सांगितले होते. मला त्याच्या रक्तगटाशी काहीच देणेघेणे नव्हते. एक तर असा चाहता होता ज्याला माझ्याशी लग्न करायचे होते. त्याने त्याच्या पत्रात लिहिले होते की, जर तुम्ही बाल्कनीमध्ये आलात, तर मी समजून जाईल की, तुम्ही देखील माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहात.”

अशाप्रकारे अनेक मजेशीर किस्से त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले आहेत. आज त्या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्यांची सर्वत्र चर्चा आहे. अजूनही त्यांची खूप मोठी फॅन फॉलोविंग आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-

हे देखील वाचा