Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड टायगर श्रॉफच्या जिम एरियामध्ये दिशा पटानीने मारली बॅक फ्लिप, अभिनेत्यानेही केली व्हिडिओवर भन्नाट कमेंट

टायगर श्रॉफच्या जिम एरियामध्ये दिशा पटानीने मारली बॅक फ्लिप, अभिनेत्यानेही केली व्हिडिओवर भन्नाट कमेंट

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ही सध्या तिच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. दिशा ही तिच्या अभिनयासोबत तिच्या फिटनेसमुळे देखील ओळखली जाते. नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बॅकक्लिप करताना दिसत आहे. तिचे हे बॅकक्लिप पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत. पण स्वतः दिशाला हे बॅक क्लिप आवडले नाहीत.

दिशा पटानी तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देते. ती नेहमीच वर्कआउट करतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती बॅकक्लिप करताना दिसत आहे. ही बॅकक्लिप तिने जरा उंचावरून केली आहे.

तिने हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शन दिले आहे की, “काश ये थोडा और मक्खन जैसा होता.” या व्हिडिओची खास गोष्ट ही आहे की, हा व्हिडिओ टायगर श्रॉफच्या जिम एरियामध्ये शूट केला आहे. मागे टीम टायगर असे लिहिले आहे.

दिशाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. सगळेजण तिला कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओवर टायगर श्रॉफने कमेंट केली आहे की, ‘क्लीन.’ या सोबतच अनेक कलाकारांनी देखील या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

दिशाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘एमएस धोनी: द अन् टोल्ड स्टोरी’ (2016), ‘बागी 2′(2018), ‘भारत’ (2019), ‘मलंग’ (2020), ‘बागी 3’ ( 2020), ‘राधे’ (2021) या चित्रपटाने तिने बॉलिवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सोबतच तीने आता राधे या चित्रपटात सलमान खानसोबत काम केले आहे. या दोघांच्या वयात खूप अंतर आहे. तरीही त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

-पांढऱ्या वाघाच्या बछड्यासोबत उर्वशीने केले ‘असे’ काही, पाहून तुम्हीही म्हणाल ‘जिगरबाज’

-एक- दोन नव्हे, तर ऋतिक रोशन एका वेळेला खातो चक्क ८ समोसे! स्वतः च केला होता खुलासा

हे देखील वाचा