Sunday, August 10, 2025
Home बॉलीवूड दिशा पटानीच्या फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, दिसतेय खूपच ग्लॅमरस

दिशा पटानीच्या फोटोने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, दिसतेय खूपच ग्लॅमरस

बॉलिवूडमध्ये खूप कमी वेळात नेम आणि फेम मिळवणारी अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. तसं पाहायला गेलं, तर बॉलिवूडमध्ये प्रवेश करून दिशाने काही जास्त काळ लोटला नाही. पण तरीही ती एक ट्रेंडिंग अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. तिचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून तिला सर्वत्र ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखले जाते. ती नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती व्यायाम करताना देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दिशा पटानीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये ती तिचे लेग्ज फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तिच्या या फोटोने अवघ्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तिच्या चाहत्यांना नेहमी प्रमाणेच हा फोटो जबरदस्त आवडला आहे. या फोटोला आतापर्यंत १६ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करत तिचे कौतुक करताना दिसत आहेत. अनेकजण या फोटोवर हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजी पोस्ट करत आहेत. दिशा ही एक फिटनेस प्रेमी आहे.(Bollywood actress disha patani’s glamorous photo viral on social media)

मागील अनेक दिवसांपासून ती बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबत स्पॉट होत आहे. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. परंतु त्या दोघांनी अजूनही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. जूनमध्ये जेव्हा दिशा पटानीचा वाढदिवस होता, तेव्हा टायगर आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफने तिचा वाढदिवस साजरा केला होता. हे फोटो दिशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते.

दिशाने 2015 साली तेलुगू ‘लोफर’ या चित्रपटातून तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनतर तिने ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा होता. यानंतर तिने ‘बाघी 2’, ‘मलंग’, ‘भारत’ आणि ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा