महाराष्ट्रात वाढत्या कोरोना विषाणूच्या विळख्यात अनेकजण सापडत चालले आहेत. यात कलाकारांचा देखील समावेश होतो. यामध्ये अभिनेत्री फातिमा सना शेख हिचा देखील समावेश आहे. तिने मागच्या सोमवारी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली होती. फातिमा सना खानने कोरोनाचे सगळे नियम लक्षात घेता, स्वतःला क्वारंटाईन केले आहे. यावेळी अनिल कपूर यांनी तिच्यासाठी एक खास गोष्ट पाठवली आहे.
अनिल कपूर यांनी फातिमा खानला त्याच्या घरचे जेवण पाठवले आहे. फातिमा खानने यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले आहे. तिने तिच्या इंस्टा स्टोरीला जेवणाचा फोटो काढून असे लिहिले आहे की, “अनिल कपूर तुम्ही सगळ्यात चांगले आहात. घरच्या या शानदार आणि चविष्ट जेवणासाठी खूप धन्यवाद.” या फोटोत पाहू शकता की, अनिल कपूर यांनी अनेक पदार्थ पाठवले आहे. कारण कमीत कमी विलगीकरणात तिला चांगले जेवण तरी मिळेल.
अनिल कपूर आणि फातिमा हे दोघेही सध्या एका चित्रपटात एकत्र काम करत आहेत. त्या चित्रपटाचे नाव अजून समोर आले नाही. काही दिवसांपूर्वीच फातिमाचा वाढदिवस झाला त्यावेळी अनिल कपूर देखील तिच्यासोबत दिसले होते.
फातिमा सना शेखसोबतच अनेक कलाकार कोरोनातून गेले आहेत. यात मनोज बाजपेयी, विक्रांत मैसी, सतीश कौशिक, रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी यांचा समावेश होतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया