अलिकडेच जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि आसपासच्या भागात पाकिस्तानकडून प्रचंड गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात १२ निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात घरे, शाळा आणि एका गुरुद्वारालाही लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे स्थानिक लोकांना सुरक्षित ठिकाणी जावे लागले. बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
फातिमा सना शेख यांनी तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, “नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या लोकांचा विचार करत आहे. पूंछ आणि आसपासच्या भागात पाकिस्तानच्या गोळीबारात चार मुलांसह १२ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. घरे आणि एक गुरुद्वारा लक्ष्य बनले आहेत, कुटुंबे त्यांचे प्राण वाचवण्यासाठी धावत आहेत. निष्पापांना लक्ष्य करणे हे सर्वात भ्याड कृत्य आहे. आम्ही गमावलेल्या सर्वांसाठी, या भयानक परिस्थितीचा सामना करणाऱ्या नागरिकांसाठी आणि सीमेवर शौर्याने लढणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षिततेसाठी माझ्या प्रार्थना आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रेड २ लवकरच जाणार १०० कोटी क्लब मध्ये; केसरी आणि भूतनीची कासवगती सुरूच…