Wednesday, July 3, 2024

फोटोत दिसणारी ‘ही’ गोड मुलगी आज आहे बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री, ओळखलं की नाही?

बॉलिवूडमधील हॉट आणि बोल्ड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. तिच्या अदांवर लाखो चाहते फिदा आहेत. सनी लिओनीने गुरुवारी (13 मे) आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. सनीने तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत तिचा हा वाढदिवस साजरा केला आहे. सोशल मीडियावर तिच्या अनेक चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवशी तिच्या पतीने तिला एका वेगळ्याच अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्त तिच्या पतीने सनीचा‌‌ लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो पाहून तुम्हीही सनीला ओळखू शकणार नाहीत.

सनी लिओनीचा पती डॅनियल वेबरने सनीला शुभेच्छा देताना तिचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती खूपच गोड दिसत आहे. तिचा हा लहानपणीचा फोटो पाहून तिला अनेकजण ओळखू शकत नाहीत की, ही सनी आहे. या फोटो सोबतच त्याने तिचा आत्ताचा फोटो देखील शेअर केला आहे.

सनी लिओनीला 40 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या पतीने खास कॅप्शन दिले आहे. त्याने कॅप्शन देत लिहिले की, “हॅप्पी बर्थडे बेबी. तू आयुष्यात सगळंकाही डिझर्व करतेस. तू एक प्रेरणा आहे. लव्ह यू. सनी लिओनी.” या फोटोवर सनीचे अनेक चाहते कमेंट करून तिला शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेक जण तिच्या या लहानपणीच्या फोटोचे कौतुक करत आहेत.

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक वर्ष ऍडल्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. त्यांनतर तिने हे सगळे सोडून दिले. तिने भारतातील सर्वात चर्चेत असलेला रियॅलिटी शो बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. या शोमधून तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

या शोमध्ये असतानाच पूजा भट्टने तिला ‘जिस्म 2’ या चित्रपटासाठी असाईन केले. या चित्रपटातील अनेक बोल्ड सीन्समुळे ती खूप चर्चेत आली होती. यानंतर तिने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले. यामध्ये ‘जॅकपॉट’, ‘वन नाईट स्टँड’, ‘कुछ कुछ लोचा है’, ‘एक पहेली लीला’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आयुष्यात मित्र कमी आणि ट्रोलर्सच जास्त भरले आहेत’, म्हणत शालूची आपल्याच फोटोवर कमेंट

-ईद मुबारक! ‘संजू बाबा’ने कुटुंबासोबत दुबईत साजरी केली ईद, पत्नी मान्यताने फोटो केले शेअर

-‘या गरीब मुलासोबत काय करतेय?’ बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपची मुलगी ट्रोल

हे देखील वाचा