प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूझने काही दिवसांपूर्वी तिच्या पहिल्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून ती तिच्या प्रेग्नेंसीच्या प्रवासाविषयी सतत अपडेट्स चाहत्यांसाेबत शेअर करत आहे. अशात अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट स्टाेरी शेअर केली आहे, ज्यामुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
खरे तर, इलियाना डिक्रूझ (ileana dcruz) हिने आतापर्यंत तिच्या न जन्मलेल्या मुलाचे वडील कोण आहे हे सांगितलेले नाही. मुलाच्या वडिलांबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते अजूनही उत्सुक आहेत. मात्र, इलियानाने कोणालाच उत्तर दिलेले नाही. अशात अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट पोस्टमध्ये सांगितले आहे की, तिचे बाळ किक मारत आहे.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बेडवर पडून झोपण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचा ग्लाे तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद सांगत आहे. या फोटोसोबत आपला अनुभव शेअर करताना तिने लिहिले की, ‘जेव्हा तुम्हाला झोपायचे असते, पण बाळाने तुमच्या पोटात डान्स पार्टी करण्याचा निर्णय घेतला असताे.’ अशाप्रकारे, इलियानाने बेबी किकचा अनुभव शेअर केला.
View this post on Instagram
इलियानाने अलीकडेच तिच्या बेबी बंपचा पहिला फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या पाळीव मांजरीसोबत बेडवर कॉफी पिताना दिसत आहे. यासाेबतच अभिनेत्रीने लिहिले की, ‘जीवन अलीकडे.’ 8 एप्रिल 2023 रोजी इलियानाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिने इंस्टा वर दोन गोंडस फोटो पोस्ट केले होते, ज्यात पहिल्या फोटोत तिने बाळाच्या कपड्यांसोबत लिहिले होते, ‘And so the adventure begins.’
इलियानाच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘मैं तेरा हिराे’, ‘बर्फी’, ‘रुस्तम’, ‘फटा पाेस्टर निकला हिराे’ यासारख्या दमदार चित्रपटात काम केले आहे.(bollywood actress ileana dcruz revealed she has been experiencing some challenges in getting a good night sleep )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पुन्हा प्रेमात पडलो…’, 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेशने जॅकलीनला लिहिले आणखी एक पत्र
तुर्किश स्टार बुराक डेनिझ पहिल्यांदाच आला भारतात, अभिनेत्याचा स्वॅग पाहून चाहेत अवाक्