Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

इलियाना डिक्रूझने प्रेग्नंसीमध्ये लुटला लाँग ड्राईव्हचा आनंद, चाहते म्हणाले, ‘बाळाचा बाप काेण?’

बाॅलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. अशात यासंबंधीचे प्रत्येक अपडेट ती तिच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करत असते. 18 एप्रिल रोजी इलियानाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. तेव्हापासून लोक इलियानाला तिच्या मुलाच्या वडिलांचे नाव विचारत आहेत. मात्र, इलियाना या सगळ्याची चिंता न करता तिच्या आयुष्याचा आनंद घेत आहे. अशात अलीकडेच अभिनेत्री लाँग ड्राईव्हला गेली, ज्याची पाेस्ट तिने तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केली आहे. 

इलियाना (ileana dcruz) हिने तिच्या प्रेग्नेंसीमध्ये लाँग ड्राईव्हचा आनंद लुटला असून तिचा एक फोटोही इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये इलियानाचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. यासाेबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सन आऊट, बंप आउट’.

Ileana D'Cruz
Ileana D’Cruz

इलियानाने गेल्या महिन्यात तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या बाळाच्या वडिलांचे नाव माहीत करून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्साही आहेत. प्रत्येकजण तिला विचारत आहे की, तिच्या भावी बाळाचे वडिल कोण आहे आणि त्याचे नाव काय आहे?

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

मंडळी, इलियाना डिक्रूज काही वर्षांपूर्वी एंड्रयू नीबोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अभिनेत्रीने एकदा इन्स्टाग्राम पोस्टवर नीबोनला तिचा “बेस्ड हबी” म्हणून उल्लेख केला होता. मात्र, दोघांचे लग्न झाले की, नाही हे स्पष्ट झाले नाही आणि 2019 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते. अशात अलीकडेच अशी बातमी आली होती की, इलियाना कॅटरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत आहे. मात्र, अद्याप याबाबत अभिनेत्रीने काेणतीही माहिती दिली नाही. (bollywood actress ileana dcruz went on a drive in pregnancy shared video and flaunted her baby bump)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सारा अली खानचा भाऊ लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, चित्रपटाचे शूटिंग केले पूर्ण

मनोज वाजपेयीचा दमदार अभिनय पाहून चाहते थक्क; कमेंट करत म्हणाले, ‘त्याला ऑस्कर द्या…’

हे देखील वाचा