Wednesday, July 3, 2024

पांढऱ्या रंगाची साडी नेसून जान्हवी उतरली पाण्यात, फाेटाे बघताच युजर्सला आठवली ‘राम तेरी गंगा मैली’ची मंदाकिनी

सण 1985मध्ये आलेल्या ‘राम तेरी गंगा मैली‘ या चित्रपटाने त्या काळात खूप खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट हिट झाला हाेता, पण त्यातील एका गाण्यात मंदाकिनीच्या धबधब्यावर पांढऱ्या साडीत आंघोळ करणाऱ्या बोल्डनेसने चांगलीच चर्चा रंगली हाेती. दिग्दर्शक राज कपूर यांनी मंदाकनीला ज्या प्रकारे शूट केले ते आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शनिवारी, अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत, जे पाहून तुम्हाला अभिनेत्री मंदाकिनीची नक्कीच आठवण येईल.

जान्हवी कपूर (jahnavi kapoor) हिने शनिवारी (दि. 21 जानेवारी)ला तिच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहे. पांढऱ्या रंगाची साडी परिधान केलेली 25वर्षीय जान्हवी कपूर पाण्यात उतरताना खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच गोल्डन बॉर्डर असलेली ही साडी जान्हवीच्या साैंदर्यात भर टाकात आहे.

तिचे चाहते आणि तिचे मित्र या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. जान्हवीचा मित्र ओरीनेही या फोटोवर कमेंट केली आहे. ओरीने जान्हवीच्या या लूकचे कौतुक करत ‘वाह वाह जान्हवी जी’ असे म्हणटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

मंदाकिनीबद्दल बोलायचे झाले, तर तिला ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटामुळे ओळखले जाते. या चित्रपटात ‘तुझे बुलाएं ये मेरी बाहें…’ या गाण्यात ती पांढरी साडी नेसून धबधब्यावर आंघोळ करताना दिसली होती. हा चित्रपट त्या काळात खूप चर्चेत आला होता.

जान्हवी कपूर गेल्या वर्षी तिच्या ‘मिली’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आली होती. या चित्रपटातील जान्हवीच्या अभिनयाचे खूप  कौतुक झाले होते. जान्हवी एकीकडे ‘गुड लक जेरी’ आणि ‘मिली’ सारख्या चित्रपटांमध्ये कमी ग्लॅमरस अवतारात दिसत आहे, तर दुसरीकडे जान्हवी तिच्या सोशल मीडियावर खूपच हॉट लूकमध्ये दिसत आहे.(bollywood actress jahnavi kapoor white saree photoshoot resemble mandakani of ram teri ganga maili latest photos)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आथिया अन् राहुल यांच्या लग्न सोहळ्यत पाहुण्यांसोमोर ठेवल्या ‘या’ अटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

निळू फुलेंच्या आयुष्यावर बनतोय बायोपिक; पोस्ट शेअर करत प्रसाद ओक म्हणाला, ‘या चित्रपटाची…’

हे देखील वाचा