बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर सतत काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाेशूटचे फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्रीने मेअकप केला असून ती प्रचंड सुंदर दिसत आहे. मात्र, अशात अभिनेत्रीच्या रुमर्ड बाॅयफ्रेंडने मजेशीर कमेंट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
जान्हवी कपूर (janhvi kapoor) आणि शिखर पहाडिया (shikhar pahariya) याची जोडी अनेक प्रसंगी एकत्र दिसली आहे. त्याचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत असतात. अशातच अभिनेत्री जान्हवी कपूर हिने अलीकडेच शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये साडीच्या स्टाईलमध्ये बनवलेला ड्रेस परिधान केला आहे, ज्यावर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत. चाहत्यांव्यतिरिक्त अभिनेत्रीची बहिण खुशी कपूह हिने अभिनेत्रीच्या फाेटाेंवर हार्ट इमाेजी कमेंट केली आहे. त्याचबराेबर अंशुला कपूरने लिहिले आहे की, ‘आय कांट’ यासह तिने इमाेजीही शेअर केला आहे.
या सर्वांदरम्यान जान्हवी कपूरचा बाॅयफ्रेंड शिखर पहाडिया याने अभिनेत्रीच्या फाेटाेवर कमेंट करत, हार्ट आणि पॉपिंग आइज इमाेजी टाकला आहे. जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांना शेवटचे 3 एप्रिल रोजी तिरुपती मंदिराबाहेर पाहिले गेले होते. त्यावेळी शिखर पहाडिया याचा वाढिदवस हाेता. शिखर पहाडियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जान्हवी कपूरने लिहिले, ‘शिखरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. चिडचिड करू नकाे.’
View this post on Instagram
जान्हवी कपूर नुकतीच ‘मिली’ चित्रपटात दिसली होती. तिच्या या चित्रपटाला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती. (bollywood actress janhvi kapoor bold photos draws rumoured boyfriend shikhar pahariya attention is interesting comment goes vira)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय बात है! शाहरुख खानने जगभरातील अनेक दिग्गजांना पछाडत पटकावले ‘टाइम’च्या यादीत अव्वल स्थान
आलिया भट्टच्या ‘त्या’ कृतीमुळे अभिनेत्री ट्राेल; साेशल मीडिया युजर्स म्हणाले, ‘हिपोक्रेट’