Monday, July 1, 2024

सेटवर रंग आणि फुलांशी खेळताना दिसली जान्हवी कपूर, पाहा भन्नाट व्हिडिओ

अभिनेत्री जान्हवी कपूर बाॅलिवूडच्या लाेकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते. जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच तिने तिचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, जाे साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

यामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूर (janhvi kapoor) सेटवर होळी खेळताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात तिच्या अंगावर आणि गालावर गुलाल उधळण्यापासून होते. यादरम्यान ती आपल्या हातांनी स्वतःवर झेंडूची फुलांच्या पाखळ्या उडवत आहे. ती कॅमेऱ्याकडे पाहून हसतानाही दिसत आहे. यासोबतच साधना सरगमच्या ‘गूंजी सी है’ या गाण्याची ट्यूनही बॅकग्राऊंडला वाजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

या व्हिडिओला 1 तासात दाेन लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर व्हिडिओवर हजाेराेच्या संख्येत कमेंट्स आल्या आहेत. या गाण्यासाठी अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे. व्हिडिओ शेअर करताना जान्हवी कपूरने लिहिले की, ‘मी मार्चची वाट पाहू शकत नाही.’ यावर अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी कमेंट केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘सुंदर क्षण’, तर एका चाहत्याने लिहिले, ‘सर्वात सुंदर मुलगी.’ एका चाहत्याने तर चक्क कमेंट करत लिहिले की,’खूप सुंदर जानू.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूर तिच्या अफेअरमुळे सतत चर्चेत आहे. तिचा एक्स बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत ती अनेकदा स्पॉट झाली आहे. त्यांच्या अफेअरच्या अनेक बातम्याही व्हायरल झाल्या आहेत. दोघे पुन्हा एकत्र आल्याचे बोलले जात आहे.(bollywood actress janhvi kapoor holi video holi fever on mili actress jhanvi kapoor seen playing with colors and flowers on the set )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
काय सांगता! मराठी बिग बॉसच्या घरात राखी सावंत होती प्रेग्नेंट? स्वतःच केला खुलासा

श्रेयश तळपदेने आपल्या नावाचे फेक ट्विटर अकाऊंट बघताच चाहत्यांना केले ‘हे’ आवाहन

हे देखील वाचा