Monday, July 1, 2024

जान्हवी कपूर बाेल्ड ड्रेस घालून चालत हाेती स्टेजवर; दरम्यान अडखळली अभिनेत्री अन्…

बाॅलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते. मात्र,  कधीकधी अभिनेत्रीची बोल्ड स्टाइलही तिच्यासाठी अडचण बनते. अशातच जान्हवीचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात ती बोल्ड ड्रेस घालून ऊप्स मुव्हमेंटची शिकार होण्यापासून वाचली आहे. नेमके काय प्रकरण? चला जाणून घेऊया…

अभिनेत्री जान्हवी कपूर (janhvi kapoor) हिचा एक व्हिडिओ पॅपराझींने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समाेर येताच साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तर झाले असे की, जान्हवी कपूर एका अवॉर्ड इव्हेंटमध्ये बोल्ड यलो ड्रेस परिधान करून पोहोचली होती आणि त्यात ती खूपच आकर्षक दिसत हाेती. अशात स्टेजवर जान्हवी कपूर पॅपराझीना विविध पाेझ देताना तिचा ड्रेस अडकला आणि ती पडता-पडता वाचली, त्यामुळे जान्हवी कपूरचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल हाेत असून साेशल मीडिया युजर्स यावर भिन्नभिन्न कमेंट करत अभिनेत्रीला चांगलेच ट्राेल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

एका युजरने अभिनेत्रीला ट्राेल करत लिहिले की, “तू असे कपडे का घालतेस जे तुला हाताळता येत नाही.”, तर एकाने लिहिले, “आज काेणीही काहीही बाेलणार नाही. कारण, ती सुंदर दिसत आहे.” अशात एका युजरने लिहिले की, “हे अतिरिक्त कापड का घातले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूर नुकतीच ‘मिली’ चित्रपटात दिसली होती. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.(bollywood actress janhvi kapoor oops moment during awards event goes viral actress troll)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुलारी खेर यांनी केले पीएम मोदी यांच्या पदवीवर भाष्य, नेटकरी म्हणाले ‘केजरीवालांना उत्तर मिळाले’

‘खतराे के खिलाडी’शाेची ऑफर धुडकावून ‘या’ अभिनेत्रीने केली माेठी चुक? चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

हे देखील वाचा