Saturday, June 29, 2024

जान्हवी कपूरने बहिणीसोबत घेतला तिरुमला बालाजीचा आशीर्वाद, मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने आपल्या दमदार अभिनयाने फार कमी वेळात एक खास ओळख निर्माण केली आहे. जान्हवी आता हिंदीसह साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे, ज्यामध्ये ती ज्युनियर एनटीआरसोबत ‘एनटीआर 30’ या चित्रपटात दिसणार आहे. अशात, जान्हवी नुकतीच तिरुमला बालाजी मंदिरात तिची धाकटी बहीण खुशीसोबत भेट देताना दिसली आहे.

आज म्हणजेच (3 एप्रिल) रोजी जान्हवी कपूर (janhvi kapoor) तिची बहीण खुशी कपूरसोबत आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पोहोचली. जिथे दोन्ही बहिणींनी तिरुमला बालाजी मंदिरात जाऊन पूजा केली. यावेळी दोघीही भारतीय कपडे परिधान करून दिसल्या. जान्हवीने गुलाबी आणि हलका हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला होता, तर खुशी लाल आणि हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात दिसली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी सध्या ‘NTR 30’ चे शूटिंग करत आहे. याची माहिती खुद्द सुपरस्टार एनटीआरने दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला शिवा करत आहेत. यापूर्वी जान्हवी ‘मिली’ चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिचे काम प्रेक्षकांना खूप आवडले होते.

जान्हवी ही चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी आहे. जान्हवीने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इशान खट्टरसोबत दिसली होती. ‘NTR 30’ व्यतिरिक्त अभिनेत्रीकडे ‘बावल’, ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या सारखे चित्रपट आहेत. याशिवाय जान्हवी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. जिथे ती तिचे प्रत्येक अपडेट फॅन्ससोबत शेअर करत असते. (bollywood actress janhvi kapoor reached tirumala balaji temple with sister khushi kapoor watch video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नाचे 10 वर्ष हाेईपर्यंत राम चरणची पत्नी उपासना हिने का हाेऊ दिले नाही मुल? अखेर केला खुलासा

लेडी सुपरस्टार नयनताराने केला तिच्या जुळ्या मुलांच्या नावांचा खुलासा, तर नवऱ्याने शेअर केले फोटो

हे देखील वाचा