Monday, July 1, 2024

जान्हवी कपूरची साऊथ चित्रपटात एन्ट्री, आरआरआर स्टारसोबत करणार काम

अभिनेत्री जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये ‘धडक‘ या चित्रपटातून पदार्पण केले. त्याचबरोबर आता ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही पदार्पण करणार आहे. जान्हवी लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत ‘एनटीआर 30’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात जान्हवी मुख्य भूमिकेत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे, जाे साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

खरे तर, जान्हवी कपूर (janhavi kapoor) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एनटीआर 30′ (ntr 30) चित्रपटातील तिच्या पहिल्या लूकची झलक शेअर केली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर पाेस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘शेवटी हे घडत आहे, माझ्या आवडत्या एनटीआरसोबत प्रवास सुरू करण्यासाठी मी वाट पाहू शकत नाही.’ या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिने साडी नेसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूरने एका मुलाखतीदरम्यान ज्युनियर एनटीआरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तेव्हापासून ती साऊथ इंडस्ट्रीत काम करणार असल्याची सतत चर्चा होत होती. अशात आता जान्हवीने एनटीआर 30’चा फर्स्ट लूक शेअर करून आनंद व्यक्त केला आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री खूप उत्सुक आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंट बद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्री लवकरच ‘राणा नायडू’मध्ये दिसणार आहे. यासोबतच ती ‘बावल ‘ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या दोन बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसणार आहे. तिचे हे चित्रपट पाहण्यासाठी चाहते प्रंचड उत्साही आहे.(bollywood actress janhvi kapoor shared a post of her south debut movie ntr 30 first look actress said finally it s happening)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अखेर अप्रत्यक्षरीत्या का होईना शैलेश लोढा यांनी सांगितले ‘तारक मेहता…’ सोडण्याचे खरे कारण

प्रियांका अन् निकच्या राेम्ॅंटिक फाेटाेंनी साेशल मीडियावर लावली आग, एकदा पाहाच फाेटाे

हे देखील वाचा