जान्हवी कपूर रिया कपूरच्या बर्थडे पार्टीत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत सहभागी होताना दिसली. बुधवारी (दि. 4 जानेवारी)ला रात्री झालेल्या या पार्टीत अनेकजण पोहोचले होते. जान्हवी बहीण रिया कपूरच्या बर्थडे पार्टीत बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत स्पॉट झाली. विशेष बाब म्हणजे कॅमेरा पाहिल्यानंतर जान्हवी लाजली आणि हाताने चेहरा लपवताना दिसली, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.
जान्हवी कपूर (janhvi kapoor) हिचा सोशल मीडियावर खूप माेठा चाहता वर्ग आहे. तिचा ‘मिली’ हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला असून ताे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या चित्रपटात तिने वडील आणि निर्माता बोनी कपूर यांच्यासोबत काम केले. सध्या जान्हवी तिच्या अफेअरमुळे खूप चर्चेत आहे.
View this post on Instagram
रिया कपूरने तिच्या वाढदिवसानिमित्त एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टित कपूर घराण्यातील अनेक लोक पोहोचले होते. यामध्ये अर्जुन कपूर, मलायका अरोरा, खुशी कपूर, अंशुला कपूर, हर्षवर्धन कपूर, मोहित मारवाह यांसारख्या प्रसिध्द कलाकारांचा समावेश हाेता. यावेळी सगळ्यांच्या नजरा जान्हवी कपूर आणि तिच्या बॉयफ्रेंडवर खिळल्या होत्या. दोघेही एकाच गाडीतून आले. यावेळी जान्हवी कपूर लाजताना दिसली. जान्हवी कपूरने पांढरा स्वेट शर्ट आणि कॅज्युअल पॅन्ट परिधान केला हाेता.
View this post on Instagram
जान्हवी कपूर आणि शेखर पहाडिया यांच्याबद्दल खूप पूर्वी बातम्या आल्या होत्या की, हे दाेघेही रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर दोघे पुन्हा एकदा मालदीव व्हेकेशनमध्ये दिसले हाेते. त्यानंतर काहीदिवसातच दोघेही अनिल कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते, ज्यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्या पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागल्यात. शिखर पहाडिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे नातू आहेत. कॉफी विथ करणमध्ये जान्हवी कपूर आणि त्याचे नाव पहिल्यांदाच समोर आले होते. जान्हवी कपूर आणि सारा अली खान शिखर पहाडियाला डेट करत असल्याचं म्हटलं जातं.(bollywood actress janhvi kapoor spotted with rumored boyfriend shikhar pahariya at rhea kapoor birthday party video goes viral on social media)
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगचे वैयक्तिक आयुष्य राहिले चर्चेत, तीन अफेयर दोन लग्न होऊनही आज तो एकटा
बिग बॉसच्या घरातून बाहेर आलेल्या अंकितचे दिसले खरे रूप, फॅन्स विचारताय खरा अंकित कोण?