Friday, July 5, 2024

स्वराच्या लग्नात दिग्गज नेते मंडळींचा समावेश; पण युजर्सकडून राज्यसभा महिला खासदार ट्राेल

अखेर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने थाटामाटात लग्न केले. जानेवारी 2023 मध्ये कोर्ट मॅरेज आणि फेब्रुवारीमध्ये एंगेजमेंट झाल्यानंतर तिने 16 मार्च रोजी दिल्लीत राॅयल रिसेप्शन आयोजित केले होते. स्वरा पती आणि समाजवादी पक्षाचे युवा नेते फहाद अहमदसाेबत लग्न बंधनात अडकून फारच आंनदी हाेती. या जाेडप्याना आशीर्वाद देण्यासाठी अनेक मान्यवर पोहोचले होते. यामध्ये काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांचा देखील समावेश हाेता. याशिवाय नेत्या जया बच्चनही या रिसेप्श साेहळ्यात आल्या हाेत्या. मात्र, यादरम्यान त्या अतिशय शांतपणे चेहऱ्यावर मास्क लावलेल्या दिसल्या.

खरे तर, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या दिल्लीच्या फार्महाऊसवर झालेल्या रिसेप्शन पार्टीमध्ये बॉलीवूड स्टार्सपेक्षा राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा अधिक समावेश हाेता. अशा परिस्थितीत या पार्टित जया बच्चन देखील दिसल्या. कारण, त्या बॉलिवूडशी संबंधित असण्यासोबतच राज्यसभा खासदारही आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पांढरा कुर्ता आणि पिवळ्या सलवार-दुपट्ट्यात जया बच्चन आपल्या साध्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. यासोबतच चेहऱ्यावर लावलेला मास्कही लोकांचे लक्ष वेधून घेत होता. कारण, संपूर्ण पार्टीत कोणीही मास्क घातलेले नव्हते. दिल्लीत पसरणार्‍या इन्फ्लूएंझा विषाणूपासून स्वतःला वाचवण्यासाठी अभिनेत्रीनी खबरदारी घेतली होत्या. अशात जेव्हा त्याचा व्हिडिओ समोर आला, तेव्हा लाेक विविध प्रतिक्रिया देऊ लागले.

जया बच्चन यांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘आडनाव काढून टाका, मग नावात काही उरणार नाही आणि सर्व अभिमान दूर होईल.’, तर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘निरुपयोगी स्त्रीच्या कार्यात दुसरी निरुपयोगी स्त्री.’ अशा विविध कमेंट करून साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला ट्राेल करत आहे.(bollywood actress jaya bachchan covered her face with mask at swara bhasker fahad ahmad reception netizens says bekar aurat)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऑस्कर पुरस्कार जिंकून भारतात परतल्यावर रामचरण झाला भावुक म्हणाला, ‘हा सिनेमा, गाणे आता आमचे नाही…’

आॅनस्क्रिन मायलेकीच्या जाेडीनं ‘नाचू किती गाण्यावर’ लावले ठुमके, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा