Saturday, July 6, 2024

बॉलिवूडची सौंदर्यतारका काजोल पहिल्यांदाच दिसणार मराठी टेलिव्हिजनवर, ‘या’ खास व्यक्तीसोबत रंगणार गप्पांची मैफिल

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये काजोलचे (Kajol) नाव सर्वप्रथम घेतले जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने काजोलने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ९० च्या दशकातील काजोलच्या यशस्वी चित्रपटांची चर्चा आजही होताना दिसते. हिंदी चित्रपट जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काजोलने अनेक सुपरहीट चित्रपट केले आहेत. यामुळेच काजोलचे असंख्य चाहते सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अभिनेत्री काजोलच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आली असून पहिल्यांदाच ती मराठी टेलिव्हिजनवर झळकणार आहे. काय आहे ही संपूर्ण बातमी चला जाणून घेऊ. 

मराठी टेलिव्हिजनवरील कोन होणार करोडपती या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला नुकतीच सुरूवात झाली आहे. अभिनेते सचिन खेडेकर या कार्यक्रमाची धुरा सांभाळत आहेत. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला जेष्ठ अभिनेत्री तनुजा आणि बॉलिवूडची सौंदर्यतारका काजोल या मायलेकींची जोडी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहे. आत्तापर्यंत कधीच एकत्र फारशी न दिसलेली ही मायलेकींची जोडी पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काजोल आणि अभिनेत्री तनुजा या एबल डिसेबल ऑफ पिपल टुगेदर या संस्थेसाठी हा खेळ खेळणार आहेत. ज्याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. कार्यक्रमाच्या पहिल्याच विशेष भागात या दिग्गज कलाकारांच्या गप्पा ऐकायला मिळणार असल्याने प्रेक्षकांनाही या भागाची उत्सुकता लागली आहे. या भागात मायलेकींच्या नात्यातील गोड किस्से, बालपणीच्या आठवणी, काजोलच्या सिनेजगतातील गोड आठवणी अशा अनेक विषयांवर मैफिल रंगणार आहे.  त्यामुळेच या कार्यक्रमाचा पहिलाच भाग चांगलाच गाजणार असल्याचे दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा