Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड काजोल करतेय ऍक्टिंग सोडण्याचा प्लॅन? म्हणाली, ‘३ तासांचा चित्रपट नाही पाहू शकत…’

काजोल करतेय ऍक्टिंग सोडण्याचा प्लॅन? म्हणाली, ‘३ तासांचा चित्रपट नाही पाहू शकत…’

कोरोना महामारीमूळे सर्वच व्यवसाय हे ठप्प पडले आहेत. आपला व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी अनेकजण धडपड करत आहेत. या महामारीचा फटका मनोरंजन विश्वाला देखील मोठ्या प्रमाणावर बसला आहे. परंतु या सर्वांतून मार्ग काढत अनेकांनी आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले. प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या अथवा अभिनेत्रीच्या आयुष्यातील काही किस्से व रोमांचक गोष्टी जाणून घ्यायला फार आवडतात, त्या गोष्टी चाहत्यांना मुलाखतीतूनही समजत असतात. अशातच आता वूट (Voot) वर ‘फीट अप विद द स्टार्स ३’ हा कार्यक्रम घेतला जातो. यामध्ये काजोलने देखील सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमातून काजोलने तिच्या आयुष्यातील कोणत्या गोष्टींचा खुलासा केलाय हे जाणून घेऊयात.

वूटवर (Voot) प्रदर्शित होणारा ‘फीट अप विद द स्टार्स ३’ या कार्यक्रमांमध्ये कलाकारांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी सांगितल्या जातात. नुकतेच या कार्यक्रमात काजोलने देखील सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालिनी अग्रवाल करते. यामध्ये काजोलने आपल्या आयुष्यातील मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. काजोल म्हणाली की, “मला माझ्या कुटुंबाचा खूप आधार आहे. मला वाचनाची फार आवड आहे. मी रोज २ ते ३ तास अगदी आरामात माझ्या कॉफीसह वाचन करू शकते. रोजच्या धावपळीच्या जीवनात मला ३ तासांचे चित्रपट पाहणे सध्या कठीण वाटते. त्यापेक्षा तो वेळ वाचनात घालवणे मला जास्त आवडते. हा पण घरी चित्रपट पाहणे कंटाळवाणे वाटत असले, तरीही मी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकते.” (Bollywood actress kajol says she leave acting and start making films)

कलाकारांच्या हास्यास्पद गोष्टी माहीत करून घेणे प्रतेक चाहत्याला आवडते. काजोल कायमच तिच्या अनोख्या अंदाजासाठी ओळखली जाते. या शोमध्ये देखील ती म्हणते की, “मी काय बोलते हे फक्त मला व माझ्या बुद्धीलाच समजते. ९०टक्के व्यक्तींना मला काय बोलायचे आहे हे समजतच नाही.” काजोलला पीनट बटर खूप आवडत, ती फुडी आहे.

या शोमध्ये काजोलने आणखी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. तो म्हणजे, तिला अभिनयापेक्षा चित्रपट निर्मितीमध्ये जास्त रस आहे. तसेच काजोल स्वतःचे इंस्टाग्राम पेज बघते, तेव्हा खूप हसते. तिला ते फार मजेशीर वाटते. असं बोलत काजोलने चाहत्यांना विचार करायला भाग पाडलंय. काजोलचा हा एपिसोड २० ऑगस्टला तुम्ही वूटवर पाहू शकता.

काजोलच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक यशस्वी व हिट चित्रपट दिले आहेत. काजोलने ‘बेखुदी’, ‘बाजीगर’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘फणा’, ‘दिलवाले’, ‘वी आर फॅमिली’ अशा अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगणच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाच्या प्रीमियमवेळी ती आपल्या संपूर्ण कुटुंबासह दिसली होती, तेव्हा काजोल आपल्या कुटुंबीयांसोबत डान्स करतानाही दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या पहाटे अमिताभ बच्चन यांनी उलगडले सोशल मीडियाचे रहस्य; नेटकरी म्हणाले, ‘झोपा आता’

-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा