Monday, July 8, 2024

गुरु नानक जयंतीनिमित्त काजोल पोहोचली गुरुद्वारात, पाहा भन्नाट फाेटाे

बॉलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री काजोल सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. इतर बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणे ती देखील तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांसाेबत शेअर करते. या दरम्यान, गुरु नानक जयंतीनिमित्त काजोलने तिचा मुलगा युग देवगणसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. गुरुद्वाराच्या बाहेर माय -लेकाची जोडी असलेला हा फाेटाे साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. हा फोटो शेअर करत काजोलने तिच्या चाहत्यांना गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काजोल (kajol) सध्या राजस्थानमध्ये आहे. जिथे ती तिच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत आहे. अलीकडेच, तिने कुटुंबासह राजस्थानच्या जवाई लेपर्ड सफारीचा आनंद घेत असलेला एक फोटो साेशल मीडियावर शेअर केला हाेता आणि आता गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये आशीर्वाद घेतल्यानंतर तिने आपला नवीन फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

फोटोमध्ये तुम्ही काजोल आणि युगला त्यांच्या पारंपरिक पोशाखात पाहू शकता. दोघेही कॅमेऱ्याकडे बघत हसत पोझ देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करत काजाेलने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गुरु नानक जयंती.’ काजोलची ही पोस्ट साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या या फोटोवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करुन तिला गुरु नानक जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत आणि माय – लेकाच्या फोटोला अप्रतिम म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजाेलच्या वर्कफ्रंट विषयी बाेलायचे झाले तर, काजोल लवकरच ‘द गुड वाईफ’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती ‘सलाम वेंकी’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेवती यांनी केले आहे.(bollywood actress kajol share a new photo with son yug devgn and wish guru nanak jayanti)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना अन् विकीच्या लग्नात झाले हाेते जाेरदार भांडणं, अभिनेत्रीनं केला खुलासा

लखनऊमध्ये प्रियांकाचा का होतोय विरोध? पोस्टर लावून विरोधक म्हणाले,’नवाबांच्या शहरात…’

हे देखील वाचा