Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड कंगना रणौत ‘ट्वीटर’वर परतली, ट्वीट करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

कंगना रणौत ‘ट्वीटर’वर परतली, ट्वीट करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

बॉलिवूडची क्वीन म्हणजेच कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण अशातच अभिनेत्री चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिचे ट्विटर अकाऊंट. कंगना रनौत दीड वर्षानंतर ट्विटरवर परतली आहे. ही माहिती खुद्द अभिनेत्रीने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे.

अभिनेत्री कंगना राणौत (kangana ranaut) हिचे ट्विटर अकाऊंट गेल्या वर्षी सस्पेंड करण्यात आले होते, पण आता क्वीन मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर परत आली आहे. कंगनाने अलीकडेच तिच्या टीमद्वारे व्यवस्थापित केलेल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून ट्विटरवर पुनरागमनाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीच्या या घोषणेने सर्व चाहते खूप खूश आहेत. कंगनाने तिच्या टीमच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत लिहिले की, ‘सर्वांना नमस्कार, इथे परत आल्याने खूप छान वाटत आहे.’ कंगना रणौतचे चाहते अभिनेत्रीचे ट्विट सतत रिट्विट करत आहेत. यासोबतच तिच्या या पोस्टवर कमेंट करून आनंदही व्यक्त केला जात आहे.

तर झाले असे की, टेस्ला प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर, कंगना राणौतने आशा व्यक्त केली की ती लवकरच ट्विटरवर परत येईल आणि तसे झाले. इतकंच नाही तर कंगनाने इलॉन मस्कच्या स्तुतीचे पूलही बांधले होते.

kangana ranaut

कंगना गेल्या एक वर्षापासून तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलद्वारे बऱ्याच लोकांशी जोडली गेली होती. मात्र, 9 मे 2021 रोजी या अभिनेत्रीचे ट्विटर अकाउंट बऱ्याच वादानंतर ब्लॉक करण्यात आले होते.

कंगना रणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने नुकतेच तिच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटाच्या नावावरून प्रत्येकाला अंदाज आला असेल की, हा चित्रपट देशातील सर्वात मोठ्या राजकीय घटनेवर आधारित आहे. ‘इमर्जन्सी’मध्ये कंगना राणौत देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनयासोबतच अभिनेत्रीने याचे दिग्दर्शनही केले आहे.(bollywood actress kangana ranaut returns to twitter after may 2022)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पटाका कुडी’ गाण्यावर थिरकली रकुल अन् शहनाज, पाहा व्हिडिओ

हाय हाय फॅशन! चक्क कचऱ्याच्या पिवशीपासून उर्फी जावेदने बनवला ड्रेस, क्रिएटिव्हिटीला मिळाली दाद

हे देखील वाचा