बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाणारी कंगना राणौत काेणत्या ना काेणत्या कारनाने कायमच चर्चेत असते. अभिनेत्रीचा स्पष्टवक्तेपणा तिला कधीकधी अडचणीत देखील आणताे. इतकंच नाही, तर अभिनेत्री अनेकदा पीएम मोदींसारख्या राजकारण्यांची बाजू घेताना देखील दिसते, याच कराणांमुळे कंगना राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशात अभिनेत्रीने यावर मौन साेडले असून एका मुलाखतीत तिच्या राजकारणातील प्रवेशावर उघडपणे सांगितले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…
तर झाले असे की, एका मीडिया संस्थेची बातचीतदरम्यान कंगनाला (kangana ranaut) विचारण्यात आले की, ‘ती राजकारणात येण्यास तयार आहे का?’ यावर प्रतिक्रिया देताना अभिनेत्री म्हणाली, “मला राजकारणी व्हायचे आहे, असे तुम्ही म्हणत असाल, तर हा एक अश्लील विचार आहे. हे आपण स्वतः म्हणू नये, जनतेने हे सांगावे. जे सत्तेच्या पदावर आहेत, जे या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात, त्यांनी हे सांगायला हवे. मला ते कसे वाटते हे अप्रासंगिक आहे. हे जनतेने ठरवायचे आहे आणि सत्तेत असलेल्यांनी मला संधी द्यावी. हा निर्णय मी त्यांच्यावर सोडतो.”
कंगना राणौत पुढे म्हणाली, ‘माझ्याकडे खूप सुंदर काम आहे, मी इतक्या सुंदर ठिकाणी जाते. पण राजकारणाचे जग खडतर आहे. कला हे एक शुद्ध प्राेफेशन आहे. कलाकारांवर सरस्वतीचा आशीर्वाद असताे आणि राजकारणाचे जग किती अक्षम्य आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. मला नेहमीच कलेशी जोडले जावेसे वाटत होते. मात्र, मला माझ्या देशाची निस्वार्थीपणे सेवा करण्याची संधी मिळाली, तर ती मी नक्कीच करेल. जर माझ्या देशाला माझी गरज असेल, तर मी तिथे आहे.”
कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री सध्या तिचा आगामी चित्रपट ‘इमर्जन्सी’च्या रिलीजच्या तयारीत आहे. याचित्रपटाचे निर्देशनही तिने केले आहे. याशिवाय कंगना ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी 2’ मध्ये दिसणार आहे. (bollywood actress kangana ranaut says it feels vulgar to declare that she wants to join politics)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चिंतेमुळे 125 किलो वाढलं वजन अन् श्वास घेण्यास हाेत हाेता त्रास; पारस छाबराचा माेठा खुलासा, म्हणाला…
हॅंडशेक करण्यासाठी आलेल्या लेडी फॅनसाेबत करीना कपूरने केले असे ‘कृत्य’, अभिनेत्रीची वागणूक पाहून चाहते थक्क