बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री करीना कपुर खान ही आपल्या कुटुंबीयांसोबत मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करत आहे. शनिवारी (२१ ऑगस्ट) तिच्या लहान मुलाचा जहांगीरचा वाढदिवस आहे. जेह आज ६ महिन्यांचा झाला आहे.
करीनाने जेहबरोबरचा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. तिने हा फोटो पोस्ट करत जेहला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये अभिनेत्रीने काळ्या आणि गुलाबी रंगाची बिकनी परिधान केली असल्याचं पाहायला मिळतंय. मालदीवमध्ये समुद्रकिनारी तिने हा फोटो क्लिक केला आहे. यामध्ये जेहने आपले डोळे मिटलेले दिसत आहेत आणि करीनाने देखील डोळे मिटलेले दिसत आहेत. तसेच ती आपल्या बाळाला हृदयाशी घट्ट धरून त्याच्यावर प्रेम करत आहे. करीनाने हा फोटो पोस्ट करत खाली कॅप्शनमध्ये हार्ट ईमोजी देखील दिले आहेत. (Bollywood actress kareena Kapoor khan celebrate 6 months birthday of jahangir)
करीनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिने जेह बरोबरचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप व गॉगल लावला आहे. तसेच यामध्ये जेहने निळ्या रंगाचे टी- शर्ट परिधान केले आहे. हा फोटोदेखील मालदीव येथीलच आहे.
अभिनेत्रीने आपल्या बाळाबरोबरचे फोटो पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्येच या फोटोंना लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. तिच्या चाहत्यांनी या फोटोंना खूप पसंती दाखवली आहे. तसेच जेहवर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती आता लवकरच अभिनेता आमिर खानबरोबर ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-एका वर्षानंतर अचानक सक्रिय झाले सुशांतचे फेसबुक अकाऊंट; चाहते म्हणाले, ‘काश तू जीवंत असता…’
-अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया