Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड ‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

‘आम्ही चित्रपट केलेच नाहीत तर…’, बॉलिवूड बॉयकॉट ट्रेंडवर बोलली प्रसिद्ध अभिनेत्री

गेले वर्ष बॉलिवूडसाठी काही खास राहिलेले नाही. बॉयकॉट ट्रेंडमुळे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. त्याचबरोबर आता शाहरुख खानच्या ‘पठाण‘वरही बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. अशातच अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कार्यकर्त्यांना चित्रपटांवर कमेंट करण्यापासून परावृत्त करण्यास सांगितले आहे. त्याचवेळी, आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननेही कोलकाता येथील एका कार्यक्रमात बॉलीवूडच्या बाॅयकाॅट ट्रेंडबद्दल सांगितले आहे.

करीना कपूर (kareena kapoor) रविवारी (दि. 22 जानेवारी)ला कोलकाता येथे एका कार्यक्रमात पोहोचली होती. यादरम्यान करीना कपूरने बाॅयकाॅटवर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली, “मी याच्याशी अजिबात सहमत नाही. असे झाले तर आम्ही तुमचे मनोरंजन कसे करणार, तुमच्या जीवनात आनंद आणि हास्य कसे येईल. तसेच चित्रपटच नसतील तर मनोरंजन कसे होणार.”

गेल्या वर्षी आलेला करीना कपूर आणि आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपटही बॉलीवूडच्या बॉयकॉट ट्रेंडला बळी पडला होता. त्यानंतरही करीना बॉयकॉटबद्दल बोलली होती. करीना म्हणाली होती, “हा एक सुंदर चित्रपट आहे. मला आणि आमिरला लोकांनी एकत्र पाहावे अशी माझी इच्छा आहे. अशा परिस्थितीत चित्रपटावर बाॅयकाॅट टाकू नका.”

त्याचबरोबर सध्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटावरही बाॅयकाॅट टाकण्याची मागणी होत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाल्यापासून दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोध सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत चित्रपटात बदल करण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चित्रपटाचे पोस्टर जाळून निषेध करण्यात आला आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.(bollywood actress kareena kapoor reacted on boycott bollywood said if there are no films then how will there be entertainment)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी अवली लवली…’ या स्कीटवरील व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर शिवाली परब म्हणाली, “ते विराट कोहलीपर्यत…”

‘मला एखाद्या खेळण्याच्या दुकानात आल्याप्रमाणेच वाटते’, सुमित राघवनने केले मुंबई मेट्रोबद्दल ट्विट

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा