Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड लग्नापूर्वी कियारा अन् सिद्धार्थचा डान्स व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘संगीत झाले…’

लग्नापूर्वी कियारा अन् सिद्धार्थचा डान्स व्हिडीओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘संगीत झाले…’

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये हे जोडपे सात फेऱ्या घेणार आहेत. त्यांच्या लग्नाची चाहत्यांनाही खूप उत्सुकता आहे. दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल आहे.

या व्हिडिओमध्ये हे लव्ह बर्ड्स एकत्र नाचताना दिसत आहेत. व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना सिड-कियाराचे चाहते विचारत आहेत की, त्यांचे संगीत झाले आहे का? त्याच वेळी, काही युजर्स असा अंदाज लावत आहेत की, हा एक म्युझिक व्हिडिओ किंवा कॉकटेल पार्टी व्हिडिओ आहे. काय आहे व्हायरल व्हिडिओ मागील सत्य? चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कियारा अडवाणी(kiara advani) तिच्या हाेणाऱ्या नवऱ्यासाेबत हिंदी गाण्यांवर डान्स करताना दिसत आहे. त्याचबरोबर डान्स स्टेप्समध्ये सिद्धार्थही तिला पूर्ण पाठिंबा देत आहे. यावेळी कियारा राखाडी रंगाच्या लेहेंग्यात खूप सुंदर दिसत आहे, तर सिद्धार्थ काळ्या ड्रेमध्ये प्रचंड स्मार्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. मात्र, हा व्हिडिओ कियारा आणि सिद्धार्थच्या संगीताचा नसून त्यांच्या खास मित्राच्या लग्नाचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी त्यांच्या लग्नासाठी सूर्यगड पॅलेसची निवड केली आहे, जिथे त्यांचे लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार होणार आहे. या दोघांच्या लग्नात कुटुंबाव्यतिरिक्त काही खास मित्र आणि करण जोहर, मनीष मल्होत्रा, शाहिद कपूर यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. इतकंच नाही तर कियाराची बालपणीची मैत्रीण आणि मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीही या ग्रँड लग्नाला पोहोचली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू झाले आहे.(bollywood actress kiara advani sidharth malhotra wedding viral couple dance video is from their sangeet know the truth)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तर अक्षय कुमारच्या ‘या’ गोष्टीमुळे इंम्प्रेस झाली ट्विंकल खन्ना आणि म्हणाली लग्नाला हो

प्रसाद ओकच्या ‘त्या’ व्हिडिओवर बायको मंजिरीची कमेंट ठरली लक्षवेधी

हे देखील वाचा