‘मोहब्बतें’ चित्रपटामधून आपल्या सोज्वळ अभिनयाने अभिनेत्री किम शर्माने चाहत्यांची मने जिंकली होती. अभिनेत्रीने या चित्रपटामध्ये साकारलेल्या अभिनयाने तरुणाईला चांगलीच भुरळ पाडली होती. तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या फिटनेस आणि बोल्ड लूकमुळे ती नेटकऱ्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. तसेच किम ही एक उत्तम डान्सर देखील आहे. आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी ती कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या तिच्या बॉयफ्रेंडमुळे ती चांगलीच चर्चेत आहे.
किमने इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर तिने कॅप्शनमध्ये काहीच नाही लिहिले. पण तिने एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्याचे इमोजी टाकले आहेत. यामधून तिने चाहत्यांना टेनिस प्लेयर लिएंडर पेस आणि ती एकमेकांवर प्रेम करत असल्याचे सांगितले आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. अनेक चाहत्यांनी त्या दोघांच्या नात्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी आणि शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. अभिनेत्रीचे चाहते तिच्या या निर्णयामुळे खूप खुश आहेत. (Bollywood actress Kim Sharma makes her relationship with tennis player Leander Paes)
यामध्ये एका चाहत्याने तिला कमेंट करत असं लिहिले आहे की,”परफेक्ट पिक्चर”, तर दुसऱ्याने लिहिलं आहे की, “खूप सुंदर, देवाची कृपा तुमच्यावर अशीच कायम राहो.” तसेच आणखी एकाने लिहिले की, “ब्युटी अँड चॅम्प.” तर एकाने “रब ने बना दी जोडी” असं लिहिलं आहे . तिने पोस्ट केलेल्या फोटोंवर अशा भरघोस कमेंट आल्या आहेत. तसेच पेरिजाद जोराबियन आणि फरा खान अलीने हार्ट इमोजीसह या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या दोघांचे सध्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी किमने लिएंडरला अटलांटा ऑलंपिक्सच्या विजयला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या होत्या. किमने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून त्याला या शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच या दोघांचे सोबत रोमँटिक पद्धतीने जेवणाचा आस्वाद घेतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या हे दोघे एकमेकांबरोबर वेळ घालवत अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मित्र परिवारासह फिरत आहेत.
अभिनेत्रीचे लिएंडर आधी अभिनेता हर्षवर्धन राणेसोबत अफेअर होते. साल २०१९मध्ये हे दोघे वेगळे झाले. त्यावेळी हर्षवर्धनने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. नुकतेच लिएंडर त्याच्या एका नवीन प्रोजेक्टमधून फ्री झाला आहे. फिल्ममेकर अश्विनी अय्यर तिवारीने सोशल मीडियाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, डायरेक्टर नितेश तिवारीसोबत त्याने एक डॉक्यूमेंट्री ड्रामा शूट केला आहे. ‘ब्रेक पॉईंट’ असे डॉक्यूमेंट्रीचे नाव असून, ती लवकरच झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. हा डॉक्यूमेंट्री ड्रामा टेनिस लेजेंड्स महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्यावर आधारित आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सुंदर अन् सोज्वळ! पांढऱ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळालं रुपाली भोसलचं ‘आकर्षक’ सौंदर्य