अभिनेत्री क्रिती सेनाॅनही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. काेणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना तिने बाॅलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. क्रितीने नऊ वर्षांपूर्वी ‘हिरोपंती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर तिने ‘बरेली की बर्फी’, ‘लुका छुपी’ आणि ‘मिमी’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अशात आज ती बाॅलिवूडमध्ये प्रसिद्ध असली, तरी एक काळ असा होता, जेव्हा तिला चित्रपट मिळत नव्हते. याबाबत खुद्द अभिनेत्रीने सांगतले आहे. नेमकी काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…
क्रिती सेनाॅन म्हणाली की, ‘जेव्हा तुम्ही फिल्मी बॅकग्राऊंडमधून येत नाही, तेव्हा इंडस्ट्रीतील लोकांना तुमचे नाव लक्षात ठेवायला खूप वेळ लागतो. मला माझ्या नावाची ओळख लोकांना करून द्यायची होती आणि ते नाव टॅलेंटला जाेडायचे हाेते. मला नेहमीच एक फिल्मस्टार म्हणून ठसा उमटवण्याची भूक होती. त्याची सुरुवात ‘बरेली की बर्फी’पासून झाली. यानंतर ‘लुका छिपी’नेही मला चांगली ओळख निर्माण करून दिली. या चित्रपटांच्या माध्यमातून मी लहान असले तरी योग्य दिशेने पावले टाकत होते. त्यानंतर ‘मिमी’ने सर्व काही बदलले आणि प्रथमच मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. इथपर्यंत पोहोचायला मला आठ वर्षे लागली.’
संभाषणादरम्यान क्रितीला विचारण्यात आले की, तुम्ही चांगले चित्रपट करू शकता असे तुम्हाला वाटत होते, पण चित्रपट निर्माते तुम्हाला संधी द्यायला तयार नव्हते, त्यावेळी तुम्हाला कसे वाटायचे? यावर अभिनेत्री म्हणाली, “हे खूप निराशाजनक होते. असे अनेक क्षण आले. मला माहित आहे की, हे मी करू शकते, परंतु मला अशा प्रकारच्या संधी मिळाल्या नाहीत.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “जेव्हा तुम्ही बाहेरून येता तेव्हा तुम्हाला लोक ओळखत नाहीत. तुमचा प्रभाव पडायला वेळ लागतो आणि लोकांना तुमच्याशी जोडायलाही वेळ लागतो. अशा स्थितीत तुम्हाला मिळत असलेल्या कामात अधिक चांगले काम करून तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता.’ क्रितीने पुढे सांगितले की, ‘तुम्ही जे काही करता ते जगातील सर्वोत्कृष्ट असेलच असे नाही, पण प्रत्येक चित्रपटाने मला काही ना काही शिकवले आहे.”
View this post on Instagram
क्रितीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, क्रिती लवकरच प्रभाससोबत ‘आदिपुरुष’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने माता सीतेची भूमिका साकारली आहे . (bollywood actress kriti sanon talks about her career says it was frustrating not getting opportunities )