Saturday, July 6, 2024

अभिनेत्री लीजा हेडनने शेअर केले मुलीला स्तनपान करतानाचे फोटो; पोस्टवर उमटतायेत जोरदार प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री लीजा हेडन तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसी दरम्यान बरीच चर्चेत आली होती. प्रेग्नेंसी दरम्यान तिच्या बिकिनी शूटने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. आता अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. शिवाय या फोटोंमुळे तिला ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागत आहे.

नुकतेच लीजाने आपल्या मुलीला स्तनपान करत असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पोस्ट केलेल्या फोटोमध्ये लीजा हेडन आणि मुलगी लारा यांच्यात एक अतिशय गोड बाँडिंग दिसून येत आहे. लीजा आणि लाराचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. त्याचबरोबर चाहते यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

हे फोटो शेअर करताना लीजाने कॅप्शन दिले की, “हा फक्त स्तनपान सप्ताह होता का? या विशेष आठवड्याच्या सन्मानार्थ लारा सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते, ज्यांनी तिला टेबलवर बसण्यासाठी जागा दिली होती.” लीजा हेडन यापूर्वी देखील असेच बोल्ड फोटो शेअर करताना दिसली आहे. त्याचबरोबर हे नवीन फोटो पोस्ट करत तिने आपल्या मुलीच्या वतीने एक विशेष संदेश दिलेला पाहायला मिळाला.

लीजा हेडनला तीन मुलं आहेत. या मुलीच्या अगोदर लिजाला दोन मोठी मुलं आहेत. लीजाने एकदा सांगितले होते की, तिला नेहमी मुलगी हवी होती. काही दिवसांपूर्वीच लीजाने तिच्या मुलीची पहिली झलक चाहत्यांना दाखवली होती.

अभिनेत्री लीजा हेडन टीव्ही प्रस्तुतकर्ता आणि मॉडेल आहे, जी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये दिसते. लीजाने तिच्या अभिनयाची सुरुवात ‘आयशा’ चित्रपटाने केला, जो २०१० मध्ये आला होता. त्याचबरोबर तिला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी नामांकनही मिळाले. लीजाने नंतर रोमँटिक आणि कॉमेडी असा ‘हाऊसफुल ३’ चित्रपट केला जो २०१६ मध्ये आला होता. त्यानंतर करण जोहर दिग्दर्शित ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटातही ती झळकली. महत्वाचे म्हणजे, अभिनेत्री लीजा हेडन भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा