Saturday, July 6, 2024

आईच्या अंत्यसंस्कारात ढसाढस रडली माधुरी दीक्षित, व्हिडिओ व्हायरल

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. 12 मार्च 2023 रोजी सकाळी 8 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशात संध्याकाळी त्यांचे अंत्यसंस्कार झाले, ज्यात सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी अभिनेत्रीसाेबत पती डॉ. श्रीराम नेने आणि धाकटा मुलगा रायन देखील उपस्थित हाेता. यावळी तिची एक झलक पाहण्यासाठी पॅपराझी कारभोवती फिरत असताना, अभिनेत्री हात जोडून पुढे गेली, ज्याचे व्हिडिओ आणि फाेटाे साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावली हाेती. त्या आजाराने त्रस्त हाेत्या. अशात रविवारी 12 मार्च रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने यांनी जॉइंट स्टेटमेंट शेअर केले, ज्यामध्ये लिहिले होते, ‘आमच्या प्रिय स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी निधन झाले.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

निर्माते अमृतपाल सिंग बिंद्रा या दु:खद प्रसंगी उपस्थित हाेती. त्यांनी माधुरीचा शेवटचा चित्रपट ‘मजा मां’ बनवला होता. याशिवाय सेलिब्रिटी मेक-अप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर देखील अभिनेत्रीच्या दुःखात सामील झाला.

माधुरी दीक्षितने तिच्या आईच्या शेवटच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर पोस्ट लिहिली हाेती. तिच्या आईसोबतच्या आठवणी शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा! आई ही मुलीची सर्वात चांगली मैत्रीण असते असे म्हणतात. ते अगदी बरोबर आहे. तू माझ्यासाठी केलेले सर्व काही, तू मला शिकवलेले धडे ही तू मला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. मी तुला चांगले आरोग्य आणि आनंदायी आयुष्य लाभाे हिच प्रार्थना करते.” ( bollywood actress madhuri dixit mother snehlata dixit funeral last rites photo video viral)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच

मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री

हे देखील वाचा