बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. मलायका अर्जुन कपूरला डेट केल्यामुळे अनेकदा टीकेचीही शिकार झाली आहे, पण ती कशाचीही लाज न बाळगता बेफिकीर राहते आणि आयुष्य एन्जॉय करते. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने आयुष्यात अनेक नवीन गोष्टी केल्या आहेत. अशात सर्व काही ठीक असले, तर ती लवकरच कपूर कुटुंबाची सून होणार आहे. मात्र, अद्याप दोन्ही बाजूंकडून अशी काेणतीही माहिती समोर आलेले नाही. अशात आता एका इव्हेंटमध्ये मलायका याबद्दल खुलेपणाने बाेलली आहे आणि खान कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले ते सांगितले आहे.
मलायका अरोराने 1998 मध्ये लग्न केल्यानंतर 2017 मध्ये अरबाज खानपासून वेगळी झाली. निर्णय दोघांचा असल्यामुळे काेणताही गाेंधळ न हाेता सर्व काही शांततेत पार पडले, अशात आता एका मुलाखतीत मलाइकाला विचारण्यात आले की, तिच्या यशाचे श्रेय खान कुटुंबाला दिले जात आहे. यात किती तथ्य आहे. यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “याने माझ्या आयुष्यात खूप मदत केली आहे, पण माझ्या मागे एखादे प्रसिद्ध आडनाव आहे या फॅक्टवर मी जगू शकेन असे मला वाटत नाही. मला वाटत नाही की, माझ्या आयुष्यात ते सर्व आहे जे मला करायचे होते. याने माझ्यासाठी बरेच दरवाजे उघडले, पण मला वाटते की, शेवटी मला माझ्या खान आडनावाशिवाय काम करावे लागेल आणि या उद्योगात टिकून राहण्यासाठी मला दररोज कठोर परिश्रम करावे लागले आणि स्वतःला सिद्ध करावे लागले.”
मलायका अरोरा म्हणाली, “माझ्याकडे बरेच लोक होते, ज्यांनी मला सांगितले की, मी खान आडनाव सोडण्याची सर्वात मोठी चूक करत आहे. अनेकजण मला सांगत होते की, तुला आडनावाचे महत्त्व माहीत नाही. मला माझ्या एक्स सासरे आणि खान कुटुंबाबद्दल खूप आदर आहे, त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. मला एक मूल आहे, आणि मी कुटुंबाचा एक भाग आहे, पण माझ्यासाठी, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याची गरज आहे… आणि हे फक्त आडनावाबद्दल नाही. माझ्यासाठी, माझे आडनाव सोडल्याने आणि माझे पहिले नाव परत आल्याने जाणीव झाली की, मी आयुष्यात काहीही करू शकते.”
मलायका अर्जुनसोबतच्या तिच्या नात्याबद्दलही बोलली. अभिनेत्याने तिचे आयुष्य प्रेमाने भरले आहे, असे अभिनेत्रीने सांगितले. त्याने खूप आनंद आणला आहे. दोघांमध्ये वयाचा फरक असला तरी दोघेही एकत्र राहण्याचा आनंद घेतात. रिलेशनशिपमध्ये असूनही तुम्ही आनंदी नसाल, तर काही उपयोग नाही, असे अभिनेत्री म्हणाली. याशिवाय जेव्हा तिला अभिनेत्याशी लग्न करण्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, ‘ती सध्या रिलेशनशिपचा टप्पा एन्जॉय करत आहे. लग्नाबाबत ती सध्या काहीच बोलू शकत नाही.’ मंडळी, आम्ही तुम्हाला सांगताे की, सध्या मलायका तिच्या प्री-हनिमून पीरियडवर आहेत.(bollywood actress malaika arora revelas advantages of having khan surname after divorce with arbaaz khan)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरसी 15’च्या सेटवर प्रभुदेवाने राम चरणला दिले एक खास सरप्राईज, पाहा व्हिडिओ
कार्तिक आर्यन करणार लग्न? अभिनेत्याच्या घोषणेने उडाली खळबळ, जाणून घ्या कोण होणार नववधू