Tuesday, July 9, 2024

मौनीच्या ‘बोल्ड ऍंड ब्यूटीफूल’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ; चाहते म्हणतायेत, ‘अगदी जलपरी दिसतेय!’

मौनी रॉय ही बॉलिवूडची एक गाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांचे मन जिंकण्यात ती कोणतीच कसर सोडत नाही. ती कामातून वेळ काढून सोशल मीडियावर देखील सक्रिय असताना दिसते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे ती सर्वत्र खूपच प्रसिद्ध आहे. तिचा प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर येत्या क्षणीच व्हायरल होत असतो. तिच्या नवीन स्टाईलमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंड होत असते. तिच्या डान्सवर तर सगळे फिदाच होत असतात. अशातच चाहत्यांना भुरळ घालणारे तिचे काही फोटो समोर आले आहेत.

मौनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मौनीनी बिकिनी टॉप आणि स्कर्ट परिधान केलेला आहे. तिने राखाडी रंगाचा बिकिनी टॉप आणि पांढऱ्या आणि राखाडी रंगाचा स्कर्ट घातलेला दिसत आहे. तसेच तिने सगळे केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. एकंदरीत ती या लूकमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. (Bollywood actress Mauni Roy share her bold photos on social media)

तिने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज खूप आवडला आहे. तिचे चाहते सातत्याने या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे फोटो पाहून चाहते तिची जलपरीशी तुलना करत आहेत. तिने शेअर केलेल्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. याआधी देखील तिने अनेक फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

मौनी रॉयच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच अयान मुखर्जीचा ऍक्शन आणि फैंटेसी ड्रामा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चनसोबत दिसणार आहे. या आधी तिची ‘लंडन कॉन्फिडेन्सीअल‌’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. तिच्या या वेबसीरिजला देखील प्रचंड प्रेम मिळाले आहे. तिने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मौनीने ‘मेड इन चायना’ या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका निभावली होती.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कुंद्राच्या अटकेदरम्यान शिल्पा शेट्टीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘मी चूक केलीय…’

-ज्याला राम गोपाल वर्मा म्हणाले होते, ‘हा मी नाही’; तोच व्हिडिओ शेअर करत इनाया म्हणतेय, ‘हे आम्हीच…’

-केबीसी: उत्तर माहित असूनही स्पर्धक आशीष सुवर्णाने घेतली नाही रिस्क, ‘या’ प्रश्नावर क्विट करत सोडला शो

हे देखील वाचा