बाॅलिवूड अभिनेत्री मौनी रॉय हिने कान्स फिल्म फेस्टिवल 2023मध्ये आपल्या साैंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. खरे तर, माैनी राॅय आपल्या खास स्टाईसह कान्सच्या रेड कार्पेटवर झळकली. यावेळी अभिनेत्री निळ्या रंगाच्या फेदर फर ड्रेसमध्ये दिसली. अशात जेव्हा मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर आले, तेव्हापासून तिचे चाहते अभिनेत्रीचे हे फोटो खूप शेअर करत आहेत. मात्र, दुसरीकडे काही लाेक अभिनेत्रीच्या या लूकसाठी तिला चांगलेच ट्राेल करत असून तिची खिल्ली उडवत आहे.
अभिनेत्री माैनी राॅय (mouni roy) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:चे काही लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे. तसेच फाेटाे शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शमध्ये लिहिले की, ‘ती अशाप्रकारे कॅन्सला गेली होती.’ व्हायरल झालेल्या फाेटाेंमध्ये माैनीने फेदर ड्रेस घातलेला असून त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. माैनीच्या या फाेटाेंवर केवळ चाहत्यांनीच नाही, तर प्रसिद्ध कलाकरांनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. दिशाने पटानीने फाेटाेवर कमेंट करत लिहिले की, ‘लव्ह’,तर आश्का गरोडिया हिने कमेंट करत हार्ट वाला इमाेजी टाकला आहे.
View this post on Instagram
अशात एका युजर्सने अभिनेत्रीच्या लूकच खिल्ली उडवत कमेंटमध्ये लिहिले की, ‘अरे, जाळ्याचा मालक कुठे गेला आहे? त्याला सांगा की, त्याच्या जाळ्यात एक मोठा मासा अडकला आहे.’, तर एका युजरने चक्क कमेंट करत लिहिले की, ‘या उर्फी जावेदने सगळ्यांना बिघडवले आहे.’ अशा प्रकारे युजर्स अभिनेत्रीच्या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत. (bollywood actress mouni roy trolled on her cannes look users commenting on her dress called its like fish net )