बी-टाऊनच्या दमदार अभिनेत्रींमध्ये मृणाल ठाकूरचा देखील समावेश आहे. मृणाल ठाकूर आपल्या अप्रतिम अभिनय आणि सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. दरम्यान, मृणाल ठाकूरचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. मृणाल ठाकूरचे हे लेटेस्ट फोटो पाहून साेशल मीडिया युजर्स संतापले आहेत आणि अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.
छोट्या पडद्यापासून सुरुवात करून रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा छाप उमटवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मृणाल ठाकूर(mrunal thakur) हिच्या नावाचाही समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी मृणाल ठाकूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फाेटाे शेअर केली. या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये मस्ती करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये मृणाल ठाकूरचा लूक खूपच हॉट दिसत आहे.
View this post on Instagram
पण हे लेटेस्ट बिकिनी फोटो मृणाल ठाकूरसाठी अडचण ठरली आहे. कारण, नेटकऱ्यांनी मृणालवर निशाणा साधला असून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रोल्सच्या नाराजीचे कारण मृणाल ठाकूरचा सुपरहिट चित्रपट ‘सीता रामम’ आहे, ज्यामध्ये तिने सीता महालक्ष्मी या साध्या मुलीची भूमिका साकारली होती.

मृणाल ठाकूरचा लेटेस्ट बिकिनी फोटो पाहून साेशल मीडिया युजर्सने आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने मृणाल ठाकूरच्या फोटोवर कमेंट करत लिहिले की, ‘एक अशी अभिनेत्री जिला मी कधीच बिकिनीमध्ये पाहू इच्छित नव्हतो, पण मृणाल तु तेही केले.’, तर आणखी एका युजरने लिहिले आहे की, ‘लोक फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्यांची बॉडी दाखवत आहेत, पण तुम्हाला माहिती नाही की, ते टॅलेंट आणि कौशल्यानेही वाढवता येते.’ अशा प्रकारे लोक मृणाल ठाकूरला ट्रोल करत विविध कमेंट करत आहेत. (bollywood actress mrunal thakur brutally trolled for latest bikini pics netizens talk about sita ramam)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गर्व, लाइफस्टाइलमध्ये पैसा…’ चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरून विवेक अग्निहोत्री यांनी साधला सुपरस्टार्सवर निशाणा
मोठी बातमी! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे निधन, वयाच्या 69व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास