Monday, July 21, 2025
Home बॉलीवूड सुपरस्टार शाहिद कपूरची अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर माहिती देत म्हणाली, ‘माझ्यात कोरोनाची…’

सुपरस्टार शाहिद कपूरची अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावर माहिती देत म्हणाली, ‘माझ्यात कोरोनाची…’

पुन्हा एकदा कोरोना व्हायरसची प्रकरणे समोर येत आहेत. मागील काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारही कोरोनाच्या कचाट्यात सापडताना दिसत आहेत. अशातच आता अभिनेत्री मृणाल ठाकूर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त समोर आले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावरून स्वत: या बातमीची पुष्टी केली आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

मृणालने (Mrunal Thakur) आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मला सौम्य लक्षणे आहेत, पण मला बरे वाटत आहे. मी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे. मी माझ्या डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसात तुम्ही मला भेटला असाल, तर कृपया तपासणी लवकर पूर्ण करावी, ही विनंती. सर्वजण सुरक्षित राहा.”

Mrunal Thakur Social Media Post
Photo Courtesy Instagrammrunalthakur

आगामी स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘जर्सी’मध्ये सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि मृणाल ठाकूर पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. शाहिद कपूर एका अयशस्वी क्रिकेटपटू आणि एका असहाय्य वडिलांच्या भूमिकेत आहे, ज्याला आपल्या मुलाची क्रिकेट जर्सीची इच्छा पूर्ण करायची आहे, तर मृणाल ठाकूर एका काम करणाऱ्या महिलेच्या भूमिकेत आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मृणालने चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनबद्दल चर्चा केली. तिने सांगितले की, “या सीनमध्ये मला शाहिदला चापट मारायची होती आणि मी खूप घाबरले होते. शाहिदने मला शांत केले आणि या दृश्याला अधिक जीवदान देण्यासाठी जोरात चापट मारायला सांगितले.”

“मी खरंच घाबरले होते. मला शाहिदचा परफॉर्मन्स खराब करायचा नव्हता. कदाचित जास्त वेळ लागणार नाही, असा विचार करून मी थांबले होते. मात्र, त्या सीनमध्ये शाहिदने मला खूप मदत केली. तो मला म्हणाला, ‘तुला मला अजून जोरात चापट मारायची गरज आहे.’ शूटिंगच्या पहिल्या चार-पाच दिवसांत आम्ही हा सीन केला. मी माझ्या पात्रात लय शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि या दृश्यामुळे मला खूप मदत झाली,” असेही ती पुढे बोलताना म्हणाली.

मृणालद्दल बोलायचं झालं, तर तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘तूफान’, ‘सुपर ३०’, ‘धमाका’, ‘बाटला हाऊस’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ती ‘पिप्पा’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा