Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड नोरा फतेहीची बोल्ड स्टाइल आवडली नाही नेटकऱ्यांना, ट्राेल करत म्हणाले, ‘मलायका अरोरा व्हर्जन 2.0’

नोरा फतेहीची बोल्ड स्टाइल आवडली नाही नेटकऱ्यांना, ट्राेल करत म्हणाले, ‘मलायका अरोरा व्हर्जन 2.0’

बाॅलिवूड अभिनेत्री नाेरा फतेही कायमच काेणत्या ना काेणत्या कारणाने चर्चेत असते. अशात नुकतीच अभिनेत्री मुंबईतील हाॅटेल बाहेर स्पाॅट झाली. यावेळी अभिनेत्रीने निळ्या रंगाचे ब्रॅलेट आणि काळ्या रंगाचे लेगिंग घातले हाेते. त्याचबरोबर तिने सुंदर गॉगलही लावला आहे आणि तिचे केस बांधलेले हाेते. अशात अभिनेत्री कारमधून उतरताच हाॅटेलच्या दिशेने जावू लागली. मात्र, यादरम्याान अनेक फोटोग्राफर्सने नाेराला घेरले आणि तिचे फाेटाे आणि व्हिडिओ क्लिक करायला सुरुवात केली, जे साेशल मीडिायवर तुफान व्हायरल हाेत आहे. असे असले तरी, अभिनेत्रीचा हा लूक तिच्या चाहत्यांना आवडला नाही आणि त्यांनी अभिनेत्रीला ट्राेल करायला सुरुवात केली.

पॅपराझींने नाेरा (nora fatehi ) हिचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “लेडी बॉस तिच्या सनग्लासेससह. नोरा फतेहीला आमच्या टीमने स्पॉट केले. अशात ती नेहमीसारखीच सुंदर दिसत हाेती.” तिच्या या व्हिडिओला 2 तासात 17 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर यावर कमेंट्सचा वर्षाव हाेत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, ‘हे आणि मलायका सारखेच आहेत.’, तर एकाने लिहिले आहे की, “मलायका अरोराची स्वस्त कॉपी बनत आहे.” अशात एकाने लिहिले की, मलाइका वर्जन 2.0.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

नोरा फतेही एक अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ती तिच्या बोल्ड डान्ससाठीही ओळखली जाते. नोरा फतेहीने अनेक चित्रपटांमध्ये विशेष काम केले आहे. तिच्यासारखा डान्स फार कमी अभिनेत्री करू शकतात. ती अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. तिची स्टाइल चाहत्यांना आवडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोरा फतेहीने काही वेळातच बॉलिवूडमध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले नाव कमावले आहे. इन्स्टाग्रामवर तिचा खूप माेठा चाहता वर्ग आहे, जे कायमच तिच्या संबधीच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.( bollywood actress nora fatehi brutally trolled for latest look trollers compares her with malaika arora see viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सिद्धार्थ जाधवने लेकीसोबतचा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “…तेव्हा बापाचा आनंद Calm Down”
उर्फी जावेदने घातला जागोजागी फाटलेला ड्रेस, युजर्सने उडवली अभिनेत्रीची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा