बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे नुसरत भरुचा होय. नुसरत आपल्या ‘टाईपकास्ट’ (एकाच प्रकारच्या भूमिका) प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, ती आपल्या आगामी ‘जनहित में जारी’ चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. या चित्रपटात तिच्या वाट्याला जरा हटके भूमिका आली आहे. तिने आतापर्यंतच्या चित्रपटांमध्ये एका बबली गर्लची भूमिका साकारली आहे, परंतु आगामी चित्रपटात ती या भूमिकेतून बाहेर येत, बोल्ड अंदाजात झळकणार आहे.
बॉम्बे टाईम्सशी बोलताना नुसरतने म्हटले की, ‘जनहित में जारी’ हा एक विनोदी चित्रपट आहे. यामध्ये ती एक ‘कंडोम सेल्स एक्झिक्युटिव्ह’च्या भूमिकेत दिसेल. चित्रपटात नुसरतच्या भूमिकेविषयी निर्माते म्हणतात की, “नुसरत या चित्रपटात छोट्या शहरातील मुलीच्या भूमिकेत असेल. जी एक शिक्षित आणि पुरोगामी मुलगी आहे. ती एका नोकरीच्या शोधात आहे. त्यानंतर तिला कंडोम बनवणाऱ्या एका कंपनीत ‘सेल्स एँड एक्झिक्युटिव्ह’ म्हणून नोकरी मिळते.”
चित्रपटाची कहानी याभोवतीच फिरताना दिसेल की, नुसरत जेव्हा मेडिकल स्टोरमधून इतर ठिकाणी कंडोम विकण्यासाठी जाते, तेव्हा तिला कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो.
अभिनेत्री आहे खूपच उत्साही
खरं तर चित्रपटाचे दिग्दर्शक हे राज शांडिल्य हे आहेत. नुसरत आणि राज यांची एकत्र काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटात नुसरतने राज यांच्या दिग्दर्शनाखाली काम केले आहे.चित्रपटाबाबत जेव्हा राज यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, “आम्ही जेव्हा मथुरेत ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाची शूटिंग करत होतो, तेव्हा माझ्या डोक्यात हा चित्रपट बनवण्याची कल्पना आली होती. मी जेव्हा नुसरतला स्टोरी सांगितली, तेव्हा ती खूपच उत्साही झाली. तिने म्हटले की, ‘मला ही भूमिका साकारायची आहे.'”
नुसरतने आतापर्यंत ‘सोनू के टिटू की स्वीटी’, ‘छलांग’, ‘प्यार का पंचनामा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक
-प्रसिद्ध गायिकेला करावा लागला होता लैंगिक शोषणाचा सामना, वयाच्या १९ व्या वर्षी होती गरोदर