Saturday, June 29, 2024

लग्नाबद्दल प्रश्न विचारताच परिणितीने दिली अजब रिॲक्शन; पाहा व्हायरल व्हिडीओ

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढासोबतच्या नात्यामुळे तुफान चर्चेत आहे. गेल्या काही दिवसात दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे, ज्यानंतर राघव आणि परिणीतीच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर सर्रास व्हायरल हाेत आहेत. अशात काल म्हणजेच मंगळवारी (दि. 18 एप्रिल)ला अशी बातमी आली होती की, परिणीतीने गुपचूप राघवशी साखरपूडा केला आहे. आता या सगळ्यामध्ये परिणीतीने मुंबईत पॅपराझींसमाेर तिच्या लग्नाच्या बातम्यांबाबत मौन साेडले आहे, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे.

खरे तर, आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यासोबतच्या लग्नाच्या अफवा पसरू लागल्यापासून परिणीती चोप्रा (parineeti chopra) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री कुठेही गेली तरी तिला फक्त तिच्या लग्नाबद्दल आणि एंगेजमेंटबद्दलच प्रश्न विचारले जात आहेत. राघव चढ्ढासोबतही असेच काहीसे घडत आहे. मात्र, परिणीती अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर दिसत असल्याने ती बहुतांशी मीडियाच्या नजरेत स्पाॅट हाेत आहेत. अशात आतापर्यंत दोघांनीही आपल्या नात्याबाबत मौन बाळगले असता परिणीतीने लग्नाच्या अफवांवर आपले मौन साेडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

तर झाले असे की, अलीकडेच परिणीती मुंबईच्या रस्त्यावर स्पाॅट झाली तेव्हा पॅपराझींने तिला तिच्या लग्नाच्या तारखेबद्दल विचारले. सुरुवातीला अभिनेत्रीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. नंतर ती हसत हसत निघून गेली आणि म्हणाली, ‘ये सब पागल हो रहे है.’ त्यानंतर ती पॅपराझींकडे वळली आणि त्यांच्याकडे पोज देत हसली. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या डेटिंगच्या अफवा पहिल्यांदा तेव्हा उफाळून आल्या होत्या, जेव्हा दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसले होते.(bollywood actress parineeti chopra breaks silence on wedding rumours with aap mla raghav chadha)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
देश साेडण्याच्या निर्णयावर प्रियांका चाेप्राला हाेतं दु:ख? म्हणाली, “घराच्या भिंती खायला…”

निधनापूर्वी सतीश कौशिक करत होते ‘या’ सुपरहिट सिनेमाच्या सिक्वलची तयारी सलमान खानने केला खुलासा

हे देखील वाचा