बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या तिच्या चित्रपटांमुळे नाही, तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. जेव्हापासून परिणीती ‘आप’ नेते राघव चढ्ढासोबत स्पॉट झाली तेव्हापासून तिच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. यासाेबतच तिच्या एंगेजमेंट आणि लग्नाबाबतही सतत चर्चा होत आहे. अशात अलीकडेच प्रियांका पती निक जोनाससोबत भारत दौऱ्यावर आली होती, तेव्हाही अभिनेत्री परिणीती राघवच्या एंगेजमेंट सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अशात आता परिणीतीने यासर्व विषयांवर माैन साेडले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…
तसे बघितल्या गेले, तर बॉलीवूड आणि राजकारणाचा संबंध नवीन नाही. त्यामुळे जेव्हा परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा एकत्र दिसले, तेव्हा मानल्या गेले की, नेता-अभिनेत्रीची आणखी एक जोडी तयार होणार आहे. मात्र, अशात अभिनेत्रीने माध्यमांशी संवाद साधताना तिच्या डेटिंगच्या अफवांवर खुलासा केला.
परिणीती चोप्रा म्हणाली की, “खरं सांगायचं, तर या प्रश्नाचं उत्तर देणं खूप कठीण आहे. कारण, तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट जगासमोर येते आणि मीडिया हे त्याचे आउटलेट आहे. आपण स्वतःला,आपला चेहरा आणि आपले नाव प्रत्येक घराघरात पोहोचवण्यासाठी कठोर परिश्रम घेताे. मात्र, कधीकधी माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत बाेलणे आणि इनसल्टिंग हाेणे याची एक लाइन क्रासॅ करण्यादरम्यान यात एक थिन लाइन आहे. असे कधी घडले असेल, जर काही गृहीत धरले जात असेल तर मी स्पष्टीकरण देईल. स्पष्टीकरण देण्याची गरज नसेल तर मी देणार नाही.” या वक्तव्याला राघव चढ्ढासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिल्याचे माानले जात आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या अफेअरबद्दलच्या बातम्यांना अधिक बळ तेव्हा मिळाले, जेव्हा राघव हसत म्हणाला की, ‘मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका.’ राघवने काहीही सांगितले नसले तरी, आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी या जाेडप्याचे अभिनंदन करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.(bollywood actress parineeti chopra open up on dating rumors with aam aadami party leader raghav chaddha)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनोरंजविश्वातील ‘या’ अभिनेत्रींनी जगातील सर्वात मोठा मातृत्वाचा आनंद टाळून दिले फक्त करिअरला प्राधान्य
‘देव डी’ फेम अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, एक मुलगी असलेल्या ‘या’ अभिनेत्रीच्या नवऱ्याबद्दल घ्या जाणून