Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड एंगेजमेंटच्या अफवांदरम्यान परिणीती चाेप्रा दिसली विमानतळावर; पॅपराझींला लाजत म्हणाली…

एंगेजमेंटच्या अफवांदरम्यान परिणीती चाेप्रा दिसली विमानतळावर; पॅपराझींला लाजत म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे युवा नेते राघव चढ्ढा यांच्या एंगेजमेंटच्या अफवा प्रचंड चर्चेत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, हे जोडपे लवकरच एकमेकांना एका फंक्शनमध्ये एंगेजमेंट रिंग्ज घालू शकतात. या सगळ्यादरम्यान परिणीती चोप्रा विमानतळावर स्पॉट झाली आणि महत्वाचं म्हणजे यावेळी अभिनेत्री पॅपराझींना पाहून लाजली.

परिणीती चाेप्रा (parineeti chopra) बुधवारी (5 एप्रिल)ला संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसली, यावेळी परिणीती चमकदार लाल स्वेटर, काळी पँट आणि बूटमध्ये स्टायलिश दिसत होती. पॅपराझीने विमानतळावर परिणीतीचे फोटोही क्लिक केले. यादरम्यान, अभिनेत्री हसताना आणि लाजताना दिसली. दुसरीकडे, जेव्हा पॅपराझींने परिणीतीला तिच्या प्लॅनिगबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्री म्हणाली, “मी लंडनला जात आहे. मी तुला बोर्डिंग पास दाखवते.”

दुसरीकडे, माध्यमातील वृत्तांवर विश्वास ठेवला तर, परिणीती या 10 एप्रिलला आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढासोबत एंगेजमेंट करणार आहे. मात्र, त्यांच्या एंगेजमेंटबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. दोघांनाही विमानतळावर सतत स्पॉट केले जात आहे. गेल्या रविवारीही हे जोडपे मुंबई विमानतळावर एकत्र दिसले होते. यादरम्यान राघवने फोटोग्राफर्सकडे पाहून स्मितहास्य केले, परंतु त्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. काही दिवसांपूर्वी राघवही परिणीतीला घेण्यासाठी दिल्ली विमानतळावर आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

परिणीती आणि राघव त्यांच्या नात्याबद्दल निःसंशयपणे मौन बाळगून आहेत, परंतु अलीकडेच गायक आणि अभिनेता हार्डी संधूने माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या नात्याची पुष्टी केली आणि सांगितले की, परिणीती आणि राघव लवकरच लग्न करणार आहेत. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे नेते संजीव अरोरा यांनीही नुकतेच ट्विटरवरून या जोडप्याचे अभिनंदन केले.(bollywood actress parineeti chopra was spotted at the airport amid rumors of her engagement to raghav chadha this week see pics)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नॅशनल क्रश’ने केला वयाचा 27वा टप्पा पार, वाढदिवसाच्या खास शुभेच्छांसाठी चाहत्यांचे मानले आभार

‘मूड थोडा गंभीर’ अमिताभ बच्चन यांनी आरामानंतर पुन्हा सुरु केली शूटिंग, फॅन्स म्हणाले…

हे देखील वाचा